आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Captaion Mahendra Singh Dhonis Para Jump At Agra

महेंद्रसिंह धोनीची विमानातून उडी, 1250 फुट उंचावरुन केले पॅराजंपिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रेनिंग घेताना धोनी - Divya Marathi
ट्रेनिंग घेताना धोनी
आग्रा- वनडे मधील टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने बुधवारी आपले आणखी एक स्वप्न पूर्ण केले. मानद लेफ्टनंट कर्नलचा किताब मिळवलेल्या धोनीने आग्रा येथे १२५० फूट उंचीवरून उडी घेतली. मलपुरा ड्रॉपिंग झोन मैदानात सकाळी ७.३० वाजता एएन-३२ विमानातून उडी घेतली आणि नंतर पॅराशूटच्या साह्याने खाली जमिनीवर उतरला.

धोनीला वेगवेगळ्या दिवशी आणखी चार उड्या घ्यायच्या आहेत. त्यापैकी तीन दिवसा तर एक रात्री घ्यावी लागेल. या उड्या घेऊन झाल्यावर धोनीचे पॅरा ड्रॉपिंगचे प्रशिक्षण पूर्ण होईल. त्यानंतर त्याला पॅराट्रूपरचा दर्जा मिळेल.

सोमवारी मैदानी चाचणी यशस्वी केल्यानंतर बुधवारी धोनीला १२५० फुटांवरून उडी घ्यायची होती. सकाळी पावणेनऊ वाजता हवेचा वेग तपासण्यासाठी सर्वात आधी हवाई दलाचे एएन-३२ एअरकॉफ्ट्स विमानाने हवाई दलाच्या तळावरून उड्डाण घेतले. वेग योग्य होता. त्यानंतर दुसरे विमान १२५० फूट उंचीपर्यंत पोहोचले. त्यात धोनी आणि त्याचे बॅचमेट होते. परंतु तेव्हा अचानक हवेचा वेग वाढला. अशा स्थितीत उडी घेणे धोक्याचे असते. सुमारे १५ मिनिटांनंतर हवेचा वेग थोडा कमी झाल्यानंतर हवेच्या दाबामध्ये पॅराशूट किती दूर जाऊन पडते याचा अंदाज घेण्यासाठी धोनीऐवजी लष्कराच्या एका जवानाने उडी घेतली. पहिला जवान ड्रॉपिंग मैदानाच्या सीमेजवळ उतरला. त्यानंतर अन्य एका जवानाने अशीच चाचणी घेतली. तोही ड्रॉपिंग मैदानाबाहेरच उतरला. त्यामुळे विमान कोठून नेल्यानंतर जवान मैदानाच्या मध्यभागी उतरेल याचा अंदाज हवाईदल अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर आकाशात फेरफटका मारून विमान परत आले. या वेळी उडी घेण्याची बारी होती ती धोनीची.

हवाई दलाने नवीन पॅराशूटची चाचणी घेतली आणि धोनीला परवानगी दिली. धोनीने आपल्या बॅचचे नेतृत्त्व करत उडी घेतली. त्याने स्टॅटिक लाइन पॅराशूट घातले होते. हे पॅराशूट एका सुती धाग्याने लॉक असते. विमानातून उडी घेताच हवेच्या दाबामुळे सुती धागा तुटला आणि पॅराशूट उघडले. हळूहळू धोनी खाली आला. ‘मला खूपच मजा आली. हे क्रिकेटपेक्षाही जास्त साहसी आहे. क्रिकेटमध्ये चेंडू पकडण्यासाठी मी उडी घ्यायचो, दुखापत टाळण्यासाठी शरीराचे वेटोळे करायचो. विमानातून उडी घेतल्यानंतर पॅराशूटच्या साह्याने जमिनीवर येताना जीव वाचवण्यासाठी शरीराचे वेटोळे करावे लागते. तो व्यायाम आज माझ्या कामी आला,’ असे खाली उतरल्यानंतर धोनी म्हणाला.

खाली उतरताच म्हणाला, मैदानात चेंडू पकडायला उडी घेणे, दुखापत टाळण्यासाठी शरीराचे वेटोळे करणे आज मला कामी आले...

पुढील स्लाइडवर क्लि करून पाहा, संबंधित फोटो..