आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या १२ जानेवारीपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, ५ वनडे, ३ टी-२० सामने खेळणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - २०१६ या नव्या वर्षाची सुरुवात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेने करणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ वनडे वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाविरुद्ध या दौऱ्यात पाच एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामने खेळेल. भारतीय संघाचा हा दौरा तीन आठवड्यांचा असेल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विजयश्री मिळवून नव्या वर्षाची चांगली सुरुवात करण्याचे प्रयत्न धोनी ब्रिगेडचे असेल. वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवाचा हिशेबही चुकता करण्याची संधी भारताकडे असेल. भारत-आॅस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला १२ जानेवारीपासून सुरुवात हाेईल. मालिकेतील पहिला वनडे पर्थ येथे होईल. दुसरा वनडे १५ जानेवारीला ब्रिस्बेन, तिसरा १७ जानेवारीला मेलबर्न, चौथा २० जानेवारीला कॅनबेरा, तर २३ जानेवारीला पाचवा वनडे सिडनीत होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेनंतर भारत तीन टी-२० सामने खेळेल. या सामन्यांतून टीम इंडियाला आगामी वर्ल्डकप टी-२० साठी आपली तयारी तपासण्याची संधी असेल. डेव्हिड वाॅर्नर अाॅस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल.

वेळापत्रक असे
१२ जानेवारी पहिला वनडे पर्थ
१५ जानेवारी दुसरा वनडे ब्रिस्बेन
१७ जानेवारी तिसरा वनडे मेलबर्न
२० जानेवारी चौथा वनडे कॅनबेरा
२३ जानेवारी पाचवा वनडे सिडनी
२६ जानेवारी पहिली टी-२० अॅडिलेड
२९ जानेवारी दुसरा टी-२० मेलबर्न
३१ जानेवारी तिसरा टी-२० सिडनी
बातम्या आणखी आहेत...