आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाला 3 वर्षांनंतर मालिका जिंकण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध दुसरी कसाेटी अाजपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताविरुद्ध दुसऱ्या कसाेटीसाठी घरच्या मैदानावर कसून सराव करताना यजमान श्रीलंकेचे खेळाडू. - Divya Marathi
भारताविरुद्ध दुसऱ्या कसाेटीसाठी घरच्या मैदानावर कसून सराव करताना यजमान श्रीलंकेचे खेळाडू.
काेलंबाे - सलामीच्या धडाकेबाज विजयाने अात्मविश्वास बुलंदीवर असलेल्या टीम इंडियाला अाता यजमान श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकण्याची संधी अाहे. भारत अाणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसाेटीला गुरुवारपासून काेलंबाेच्या मैदानावर सुरुवात हाेणार अाहे. भारताने सलामीला विजय मिळवून तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली.  तीन वर्षांपूर्वी २०१५ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्धची तीन कसाेटी सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली हाेती. अाता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिका विजयाचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. यासाठी काेहलीच्या  युवा ब्रिगेडने कंबर कसली  अाहे.  
 
लाेकेश राहुल फिट : अाजारातून सावरल्याने अाता टीम इंडियाचा युवा फलदंाज लाेकेश राहुल दुसऱ्या कसाेटीसाठी फिट अाहे. त्यामुळे त्याचा या कसाेटीतील सहभाग निश्चित मानला जाताे. मात्र, यातून अाता सलामीच्या जाेडी निवडीसाठी काेहलीसमाेर माेठा पेच निर्माण झाला अाहे. राहुलला संधी दिल्यास दुसऱ्या सलामीवीरासाठी शिखर धवन व अभिनव मुकुंद यांच्यात मुकाबला रंगणार अाहे. यात धवनचा दावा मजबूत अाहे. त्याने गत कसाेटीत १९० धावांची मजबूत खेळी केली हाेती.   
 
पुष्पकुमाराला पदार्पणाची संधी : जायबंदी खेळाडूंमुळे यजमान  अद्यापही अचडणीत अाहे. जखमी  फिरकीपटू रंगना हेराथला विश्रांती देण्यात अाली. त्याच्या जागी मलिंडा पुष्पकुमारचा संघात समावेश करण्यात अाला. त्याला अांतरराष्ट्रीय कसाेटीत पदार्पणाची संधी अाहे. तसेच वर्षभरानंतर लाहिरू थिरीमाने हा दुसऱ्या कसाेटीत खेळेल. 
 
भारताच्या पाच खेळाडूंना विक्रमाची संधी
पुजाराची ५० कसाेटी; चारहजारीची संधी :  चेेतेश्वर पुजारा करिअरमधील ५० वी कसाेटी खेळेल. यासह त्याला या खास कसाेटीत नव्याने कामगिरी करण्याची संधी अाहे. ताे कसाेटीत ४ हजार धावा पूर्ण करू शकताे. असे करणारा पुजारा हा १५ वा भारतीय फलंदाज ठरेल.
 
पुढील स्लाइडवर वाचा, विराट काेहली १०० व्या डावात खेळणार आणि शिखर धवन खेळणार २५ वी कसाेटी...
 
> प्रक्षेपण साेनी सिक्स, टेन ३ वर सकाळी १० वाजेपासून  
 
बातम्या आणखी आहेत...