आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायनलमध्ये कुणाशी भिडणार टीम इंडिया? विराटने दिले हे उत्तर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय उच्च आयुक्तालयाच्या इव्हेंटमध्ये बोलताना विराट कोहली. - Divya Marathi
भारतीय उच्च आयुक्तालयाच्या इव्हेंटमध्ये बोलताना विराट कोहली.
लंडन - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी आहे. टीम इंडियालाच विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. यामुळे चाहत्यांना अंतिम सामना भारत विरुद्ध इंग्लंड होण्याची आशा आहे. यावरूनच जेव्हा भारतीय कर्णधार विराट कोहलीला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तो उत्तरला, "आमची टीम कुठल्याही प्रतिस्पर्ध्यासाठी तयार आहे."
 
भारत Vs पाक अशीही होऊ शकते फायनल...
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017ची फायनल भारत विरुद्ध पाकविरुद्धही होऊ शकते. जर टीम इंडियाने बांगलादेशला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आणि पाकनेही दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला, तर क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत Vs पाकिस्तान संघांदरम्यान जबरदस्त चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.
 
भारतीय उच्चायुक्तालयाच्या इव्हेंटमध्ये गेली होती टीम...
- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया 15 जून रोजी बांगलादेशाशी भिडणार आहे. तथापि, 14 जून रोजी आणखी एक सेमीफायनल पाक विरुद्ध इंग्लंडदरम्यान होईल. दोन्ही सामन्यांत जिंकणारे संघ 18 जून रोजी फायनलमध्ये भिडतील.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा टीम इंडियाचे या इव्हेंटमधील आणखी 5 फोटोज....
बातम्या आणखी आहेत...