आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉर्डर-गावसकर सिरीज: पहिल्या 2 कसोटींसाठी संघाची घोषणा, बांगलादेशविरुद्धचा संघ कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऑस्ट्रेलियाच्या विरोधात होणाऱ्या पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बांग्लादेशच्या विरोधात निवडण्यात आलेली 15 मेंबरची टीम कायम ठेवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ सोमवारीच भारतात आला आहे. बॉर्डर-गावसकर चषकात दोन्ही संघादरम्यान 4 कसोटी खेळणार आहे. त्याच्यापूर्वी सोमवारी भारताने बांगलादेशला 208 धावांनी पराभूत करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. 
 
शमी-रोहितचे पुनरागमन नाही..
- इंग्लंड सिरीजदरम्यान जखमी झालेला फास्ट बॉलर मोहम्मद शमीचे टीम इंडियात पुनरागमन होऊ शकलेले नाही. 
- तसेच दुखापतीमुळे बाहेर असलेल्या रोहित शर्मालाही संघात स्थान मिळवता आलेले नाही. 
- ऑस्ट्रेलिया सिरीजपूर्वी तो फिट असून नॅशनल क्रिकेट अकादमीत सराव करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. 
- रोहित गेल्यावर्षी न्यूझीलंडच्या विरोधातील अखेरच्या वन डेमध्ये जखमी झाला होता. 
- दुसरीकडे इंग्लंड विरोधात त्रिशतक करमाऱ्या करुन नायरला पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. 

अमित मिश्राही जखमी 
- स्पिनर अमित मिश्राही ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील पहिल्या दोन कसोटींसाठीच्या संघात स्थान मिळवू शकलेला नाही. 
- तो बांगलादेश कसोटीच्या एक दिवसापूर्वी टीममधून बाहेर पडला होता. 
- बेंगळुरूतील इंग्लंडविरोधातील टी20 मॅचमध्ये फिल्डींग करताना मिश्रा जखमी झाला होता. 

अशी आहे टीम इंडिया.. 
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहाणे, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंत यादव, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद, हार्दिक पंड्या. 
ऑस्ट्रेलिया दौऱ्याने संपणार सर्वात मोठा कसोटी हंगाम 
- 85 वर्षातील भारताचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा कसोटी हंगाम ऑस्ट्रेलिया दौऱ्यानेच संपणार आहे. 
- या हंगामात भारत 17 कसोटी खेळणार होता. त्यापैकी 13 कसोटी भारताने खेळल्या असून ऑस्ट्रेलिया विरोधात ४ कसोटी होणार आहेत. 

असे असतील सामने 
पहिली कसोटी 23-27 फेब्रुवारी - पुणे 
दुसरी कसोटी 4-8 मार्च - बेंगळुरू 
तिसरी कसोटी 16-20 मार्च - रांची
तिसरी कसोटी 25-29 मार्च - धर्मशाळा 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, पहिल्या दोन कसोटींसाठी निवडलेला भारतीय संघ आणि खेळाडुंच्या कामगिरीचा आढावा..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...