आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team India Selection For Two ODI And Test For South Africa Series

शेवटच्या दोन वन डेसाठी अरविंदला मिळाली संधी, टेस्टमध्ये अश्विन ऐवजी जडेजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या दोन वन डे सामन्यांसाठी टीम इंडियात केवळ एकच बदल करण्यात आला आहे. उमेश यादवच्या ऐवजी अरविंदला टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. तर, पहिल्या दोन टेस्टसाठी आर. अश्विनच्या ऐवजी रवींद्र जडेजालाने संघात पुनरागमन केले आहे. रणजी सामन्यात दुखापत झालेला इशांत शर्माचीदेखील टेस्ट टीमसाठी निवड झालेली आहे.

युवराजला संधी नाही
रविवारी रणजीमध्ये गुजरातविरुद्ध 187 धावा करण्यार्‍या युवराजसिंगला पुन्हा एकदा निराशाच व्हावे लागले. माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी त्याला संघात सामिल करण्याबाबत सल्ला दिला होता. तरीदेखील निवड करत्यांनी त्याला संधी दिली नाही. युवराजच्या वयाचा विचार करून त्याला डावलणे योग्य ठरणार नाही असे मत गावसकर यांनी निवडकरत्यांपुढे माडले होते.
7 सामन्यात केवळ 122 धावा करणारा रैना टीममध्ये
रैनाच्या शेवटच्या 7 वन डे सामन्यांवर दृष्टीक्षेप टाकला तर त्याने केवळ 122 धावा केल्या आहेत. ज्यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. या संमन्यांमध्ये त्याचा हायएस्ट स्कोर केवळ 40 धावा आहे, ज्या त्याने जूनमध्ये बांगलादेशविरुद्ध केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राजकोटमध्ये तो केवळ शून्यवर बाद झाला होता. इंदोरमधील दुसर्‍या वन डेतही तो भोपळा फोडुशकला नव्हता. तर कानपुरमध्ये पहिल्या सामन्यात त्याने केवळ 3 धावा केल्या होत्या.
शेवटच्या देन वनडेसाठी भारतीय संघ
महेंद्र सिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा, रोहित शर्मा, एस अरविंद, हरभजनसिंग, स्टुअर्ट बिन्नी, गुरकीरतसिंग मान, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, अक्षर पटेल.
पहल्या दोने टेस्टसाठी टीम इंडिया
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, केएल राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण एरॉन आणि इशांत शर्मा.
बोर्ड प्रेसिडेंट XI
चेतेश्वर पुजारा (कर्णधार), केएल राहुल, करुण नायर, श्रेयस अय्यर, उन्मुक्त चंद, नमन ओझा, हार्दिक पंडया, जयंत यादव, कुलदीप यादव, नाथू सिंह, कर्ण सिंह, शेल्डन जॅक्सन, शार्दुल ठाकुर.