आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाची अाघाडी, दुसऱ्या डावात 2 बाद 125; आफ्रिकेला 184 धावांत गुंडाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेेहाली - काेहली ब्रिगेडने फ्रीडम मालिकेतील सलामीच्या कसाेटीत मजबूत पकड घेतली. भारतीय संघाच्या फिरकीपटूंनी अाफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १८४ धावांत गुंडाळून १७ धावांची अाघाडी मिळवली. यामध्ये अश्विनने पाच, रवींद्र जडेजाने तीन अाणि अमित मिश्राने दाेन विकेट घेऊन सामन्याला कलाटणी दिली. गाेलंदाजांपाठाेपाठ टीम इंडियाच्या फलंदाजांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या डावात खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी दुसऱ्या दिवसअखेर दाेन बाद १२५ धावा काढल्या. अाता यजमान टीमकडे एकूण १४२ धावांची अाघाडी अाहे. यामध्ये सलामीवीर चेतेश्वर पुजारा नाबाद ६३ अाणि विराट काेहली हा ११ धावांवर खेळत अाहे. या वेळी मुरली विजयने ४७ धावांचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले.

अश्विनचा दबदबा कायम
टीम इंडियाचा अार. अश्विन हा अापल्यासाठी धाेकादायक असल्याचे पाहुण्या दक्षिण अाफ्रिका टीमने सामन्यापूर्वीच सांगितले हाेते. अाफ्रिकन फलंदाजांच्या मनात असलेली अापली भीती अश्विनने सत्यामध्ये उतरवली. त्याने कर्णधार अामलासह पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याने २४ षटकांमध्ये ५१ धावा देत पाच गडी बाद केले. डिव्हिलर्सला अमित मिश्राने त्रिफळाचीत करून अाफ्रिकेला माेठा धक्का दिला.

सात फलंदाज एकेरीत बाद
टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी जगातील कसाेटीची नंबर वन टीम अाफ्रिकेच्या नाकीनऊ अाणले. या गाेलंदाजांनी सात फलंदाजांना धावांचा दुहेरी अाकडाही पार करू दिला नाही. डिव्हिलर्सने जीवदानाचा फायदा घेताना ६३ धावांची खेळी केली. अामलाने ४३ व एल्गरने ३७ धावांचे याेगदान दिले. काेणताही फलंदाज दुहेरी अाकडा पार करू शकला नाही.

डेल स्टेनला दुखापत
भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात वेगवान गाेलंदाज डेल स्टेनला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला पहिल्या कसाेटीत भारतीय फलंदाजांना राेखण्यासाठी मैदानावर उतरता अाले नाही.

अश्विनच्या १५० विकेट
भारताच्या अार. अश्विनने १५० विकेट पूर्ण केल्या. त्याने अवघ्या २९ कसाेटींत हे यश संपादन केले. बळींच्या दीड शतकाला गवसणी घालताना अश्विनने श्रीलंकेचा मुरलीधरन अाणि अाॅस्ट्रेलियाच्या शेन वाॅर्नला पिछाडीवर टाकले. वाॅर्नने ३१ कसाेटींत अाणि मुरलीने ३६ कसाेटींमध्ये १५० विकेट पूर्ण केल्या हाेत्या.

भारतीय फलंदाजांवर काैतुकाचा वर्षाव
स्पिन ट्रॅकवर दुसऱ्या डावामध्ये भारतीय फलंदाजांनी अापल्यातील क्षमता सिद्ध केली. हे सर्व फलंदाज काैतुकाचे मानकरी ठरले. फिलेंडरने धवनला शून्यावर बाद केले.त्यानंतर विजयने ४७, चेतेश्वर पुजारा नाबाद ६३ अाणि विराट काेहलीने नाबाद ११ धावांची खेळी केली. मुरली विजय व पुजाराने दुसऱ्या गड्यासाठी ८६ धावांची भागीदारी केली.
बातम्या आणखी आहेत...