आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया अव्वल, अाॅस्ट्रेलियाची घसरण अायसीसी कसाेटी क्रमवारी, न्यूझीलंड चाैथ्या स्थानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- श्रीलंकेविरुद्धच्या कसाेटी मालिकेत एकतर्फी विजयाच्या बळावर टीम इंडियाने नंबर वनचे अापले सिंहासन कायम ठेवलेे. भारतीय संघ अाता अायसीसीच्या कसाेटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर अाहे. दुसरीकडे अाॅस्ट्रेलियन टीमला क्रमवारीत माेठा फटका बसला. अाॅस्ट्रेलियाची पाचव्या स्थानावर घसरण झाली. अायसीसीने नुकतीच कसाेटी टीमची क्रमवारी जाहीर केली.
   
अाॅस्ट्रेलिया टीमने गुरुवारी मालिकेतील शेवटच्या अाणि दुसऱ्या कसाेटीमध्ये यजमान बांगलादेशचा पराभव केला. यासह अाॅस्ट्रेलियाने मालिकेत बराेबरी साधली. मात्र, सलामीचा सामना गमावल्यामुळे अाॅस्ट्रेलियाचे क्रमवारीत नुकसान झाले. अाता अाॅस्ट्रेलियाच्या नावे एकूण ९७ रेटिंग गुण झाले अाहेत. न्यूझीलंड टीम ९७ गुणांसह चाैथ्या स्थानावर अाहे. यासह टीमने अापले स्थान कायम ठेवले अाहे. मात्र, अाॅस्ट्रेलियाला प्रत्येकी ९७ गुण असूनही क्रमवारीत फटका बसला अाहे. 

भारताने १२५ गुणांसह अापले अव्वल स्थान कायम ठेवले अाहे.  भारताने श्रीलंकेविरुद्धची तीन कसाेटी सामन्यांच्या मालिकेत एकतर्फी विजय संपादन केला. भारताने ३-० ने ही मालिका जिंकली. यामुळे भारतीय संघाला अापले अव्वल स्थान कायम ठेवता अाले. हे स्थान अधिक मजबुत करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

त्यापाठाेपाठ दक्षिण अाफ्रिका टीम दुसऱ्या स्थानावर अाहे. या संघाच्या नावे १०५ गुण अाहेत. तसेच क्रमवारीत इंग्लंड टीमने अापले तिसरे स्थान कायम ठेवले.   

फाॅर्मात असलेल्या बांगलादेशने सलामीच्या कसाेटीतील विजयाच्या बळावर क्रमवारीतील अापले स्थान कायम ठेवले अाहे. बांगलादेश संघ नवव्या स्थानावर अाहे. या टीमचे ७४ गुण अाहेत. त्यापाठाेपाठ झिम्बाब्वे टीम सर्वात शेवटी दहाव्या स्थानी अाहे.
बातम्या आणखी आहेत...