आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Team Indian Captain Mahendra Singh Dhoni And Sakshi Love Story

अशी आहे धोनी आणि साक्षीची LOVE STORY, पहिल्या नजरेत पडले प्रेमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका (बांगलादेश)- टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तुफान फलंदाजीच्या बळावर बांगलादेशी खेळाडूंना चांगलाच धडा शिकवला. सोशल मीडियावर सुरु असलेल्या अॅंटी इंडिया मोहिमेला चाप लावला. त्यामुळे धोनी आणि टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. चमकदार बॅटने बांगलादेशी खेळाडूंचे शिर उडवणारा धोनी मात्र खासगी आयुष्यात खुपच प्रेमळ आहे. त्याचे साक्षीवर अतोनात प्रेम आहे. दोघांचे लव्ह मॅरेज आहे. या पार्श्वभूमिवर जाणून घ्या दोघांची लव्ह स्टोरी....
पहिल्‍याच भेटीत भाळली होती साक्षी
टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची लव्ह स्टोरी फारच गमतीदार आहे. महेंद्र सिंह धोनी आणि साक्षीची पहिली भेट कोलकत्याच्या एका फाईव स्टार हॉटेलमध्ये झाली. भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये भाग घेण्यासाठी तेथे धोनी गेला होता. त्यावेळी साक्षी रावत हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण करून तेथे इंटर्नशिप करत होती. भारतीय खेळाडू याच हॉटेलमध्ये थांबले होते. याच मालिकेच्या दरम्यान धोनीच्या मॅनेजरने धोनीची ओळख साक्षीसोबत करून दिली आणि धोनी पहिल्याच भेटीत साक्षीच्या प्रेमात पडला.
चट 'मंगनी' पट 'ब्याह'
या भेटीच्या वेळीच दोघांनीही एकमेकांचे फोन नंबर्स घेतले. गप्पागोष्टींना सुरुवात झाली. याच काळात धोनीचे एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीबरोबरही संबंध असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्याचा धोनीच्या लव्ह स्टोरीवर काहीच परिणाम झाला नाही. 4 जुलै 2010 ला देहराडूनजवळ असलेल्या एका रिसॉर्टमध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नाच्या एक दिवस आधीच त्यांचा साखरपुडा झाला होता.
बालपणीचे मित्र
धोनी आणि साक्षी हे बालपणीचेच मित्र आहेत. ते रांचीच्या डीएव्ही श्यामली शाळेत सोबतच शिकत होते. दोघांचे वडीलही एकाच कंपनीत काम करत. साक्षीचे कुटूंब तिच्या वडीलांच्या रिटायरमेंटनंतर देहराडूनला शिफ्ट झाले. तर धोनीचे कुटूंब रांचीमध्येच स्थाईक झाले. मात्र जेव्हा धोनी आणि साक्षीची हॉटेलमध्ये भेट झाली, तेव्हा धोनी तिला ओळखू शकला नव्हता.

सुप्रसिद्ध व्यक्ती झाले होते लग्नात सामील
धोनी आणि साक्षीच्या गूपचूप झालेल्या लग्नाला स्पिनर हरभजन सिंह, आशीष नेहरा, रूद्र प्रताप सिंह, सुरेश रैना आणि रोहित शर्मा शिवाय बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर आणि बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन देखील उपस्थित होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, धोनीची पत्नी ग्लॅमरस साक्षीचे फोटो.....