आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा प्रकारे मस्ती करताना दिसले भारतीय खेळाडू, हा आहे कुंबळेचा नवा प्रयोग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Beach Volleyball खेळताना विराट कोहली. - Divya Marathi
Beach Volleyball खेळताना विराट कोहली.
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडीज दौ-यात भारतीय संघातील खेळाडूंना ताजेतवाने ठेवण्यासाठी टीमचे नवे प्रशिक्षक अनिल कुंबळे सातत्याने नवे नवे प्रयोग करताना दिसत आहे. योगा सेशन आणि ड्रम सेशननंतर आता त्यांनी सेंट किट्समध्ये आणखी एक प्रयोग केला. तेथे त्यांनी भारतीय खेळाडूंना Beach Volleyball चा खेळ खेळण्यास भाग पाडले. ज्यामुळे खेळाडूंना ताजेतवाने पण वाटेल आणि तेथील हवामान व वातावरणाशी जुळवून घेता येईल असा कुंबळे सरांचा होरा आहे. कुंबळे सरांची आयडिया खेळाडूंनाही आवडली व त्यांनी Beach Volleyball जबरदस्त एन्जॉय केला. यादरम्यान, सर्वच खेळाडू एकदम मस्ती करतानाच्या मूडमध्ये दिसत होते. ड्रेसिंग रूममधील वातावरण हलके होण्यासाठी व खेळाडूंतील त्रुटी दूर होण्यासाठीही कुंबळे असे वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, भारतीय खेळाडूंनी कसा केला Beach Volleyball एन्जॉय...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...