आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही संघांचा कसून सराव, उद्या मुंबईत इंग्लंड-भारत अ संघाचा सराव सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - भारताविरुद्ध कसोटी मालिकेत ४-० ने पराभूत झाल्यानंतर अात इंग्लंड वनडे आणि टी-२० मालिकेसाठी जोरदार तयारी करत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी रविवारी ब्रेबोर्न स्टेडियमवर कसून सराव केला. टीम इंडियात पुनरागमन करणारा युवराजसिंग, शिखर धवन आदी खेळाडूंनी सुद्धा रविवारी कसून सराव केला. युवराज आणि शिखर धवन दोघेही भारत अ संघाकडून खेळणार आहेत.

इंग्लंडला वनडे मालिकेआधी भारत-अ संघाविरुद्ध दोन सराव सामने खेळायचे आहेत. हे दोन सामने १० आणि ११ जानेवारी रोजी होतील.  

भारत आणि इंग्लंडदरम्यान पहिला वनडे पुण्यात १५ जानेवारी रोजी होईल. दुसरा वनडे १९ जानेवारी रोजी कटक येथे, तर तिसरा वनडे २२ जानेवारी रोजी कोलकाता येथे रंगेल. पहिला टी-२० सामना  २६ जानेवारी रोजी कानपूरला, दुसरा २९ रोजी नागपूरला, तर तिसरा १ फेब्रुवारी रोजी बंगळुरूत होईल.   

इंग्लंडकडून प्रमुख फलंदाज जो. रुट वगळता संपूर्ण संघाने सकाळी तीन तास कसून सराव केला. इयान मोर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ वनडेत खेळणार आहे. कसोटी खेळणारे खेळाडू मायदेशी परतले आहे.  मोर्गन कसोटी संघाचा सदस्य नव्हता, तर अॅलेस्टर कुक वनडे, टी-२०  संघात नाही.   
 
धोनी करणार अखेरीस नेतृत्व 
१० जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात भारत अ संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनी भूषवणार आहे. वनडे, टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर धोनी अखेरीस कर्णधार म्हणून मैदानावर दिसेल.
 
भारत अ संघ असा : पहिल्या सामन्यासाठी (१० जानेवारी): महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, मनदीप सिंग, अंबाती रायडू, युवराजसिंग, हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, आशिष नेहरा, मोहित शर्मा, सिद्धार्थ कौल.
१० जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्यात भारत अ संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनी भूषवणार आहे. वनडे, टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर धोनी अखेरीस कर्णधार म्हणून मैदानावर दिसेल.