आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा, सानिया मिर्झाच्या बहिणीच्या लग्नातील संगीत व मेहंदी रसमचे फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानियाची बहिण अनम पती अकबर राशिदसोबत (इनसेटमध्ये सानिया मिर्झा) - Divya Marathi
सानियाची बहिण अनम पती अकबर राशिदसोबत (इनसेटमध्ये सानिया मिर्झा)
स्पोर्ट्स डेस्क- इंडियन टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या बहिणीचे शुक्रवारी सायंकाळी (18 नोव्हेंबर) हैदराबादमध्ये लग्न झाले. या लग्नासाठी सानिया आपला पती क्रिकेटर पती शोएब मलिकसह हैदराबादमध्ये दाखल झाले होते. या लग्नातील अनेक कार्यक्रमाचे फोटोज समोर आले आहेत. ज्यात सानिया आणि तिची फॅमिली एन्जॉय करताना दिसत आहे. सानियाची बहिण अमनचा होणारा पती बिजनेसमॅन आहे. बॉलिवूड स्टार्सने केला डान्स, उथप्पाची पत्नी शीतलही पोहचली....
- या ग्रॅंड वेडिंगसाठी अनेक इवेंट्स हैदराबादमध्ये सुरु आहेत. गुरुवारी सानियाच्या बहिणीची संगीत सेरेमनी झाली.
- यात सानियाचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकही सहभागी झाला होता. विशेष म्हणजे, सप्टेंबर 2015 मध्ये झालेल्या अमनच्या इंगेजमेंट कार्यक्रमाला शोएब येऊ शकला नव्हता.
- संगीत सेरेमनीत बॉलिवूड स्टार्स सलमान खान, परिणिती चोप्रासह क्रिकेटर रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल सहभागी झाली होती.
अकबर राशिदसोबत लग्न-
- अनमचा साखरपुडा एक वर्षापूर्वी अकबर राशिदसोबत झाला होता. अकबर हैदराबादमधील बिजनेसमॅन आहे. साखरपुड्याच्या आधीच हे कपल अनेकदा पब्लिक इवेंट्समध्ये दिसून यायचे.
- साखरपुड्याचा कार्यक्रम हैदराबादमधील एका हॉटेलात झाला होता. यात नातेवाईक आणि मिर्झा फॅमिलीतील जवळच्या लोकांना बोलावले होते.
- पाहुण्यांना नवाबी हैदराबादी पदार्थ ठेवले होते. या कार्यक्रमात मुंबईतील गजल गायक पूजा गायतोंडेने पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले होते.
किंग खानची फॅन आहे अनम-
- सानियाची बहिण अनम बॉलिवूड स्टार शाहरुख खानची मोठी फॅन आहे. तिने शाहरुख खानचा फोटो आपल्या खोलीत लावला आहे.
- शाहरुखसोबतचे अनेक फोटो तिने टि्वटरवर शेयर केले आहेत.
- ती आयपीएलमध्ये कोलकाता नायटरायडर्सच्या अनेक मॅचसाठी स्टेडियममध्ये दिसते.
- अनमने मास कम्युनिकेशनचा कोर्स केला आहे. आता ती एक स्टायलिस्ट म्हणून काम करत आहे. ती अनेक इवेंट्ससाठी सानियाला तयार करते.
- बहिणीप्रमाणेच अमनला खेळातही कौशल्य, रस आहे. अनम पिस्तूल शूटर आहे व अनेक स्पर्धांत तिने सहभाग घेतला आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, संगीत आणि मेहंदी रस्मचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...