आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Tour Of Bangladesh, Only Test 3rd Day: Bangladesh V India At Fatullah

Ind vs Ban : तिसऱ्या दिवसअखेर भारत 6 बाद 462, पावसाचा पुन्हा व्यत्यय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या पहिल्या डावात 6 बाद 462 धावा झाल्या आहेत. लंचनंतर पावसाने अडथळा आणल्याने पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही.
पावसामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळावर पाणी फेरले गेले होते. पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला होता, त्यानंतर तिसरा दिवस बांगलादेशसाठी चांगला ठरला आहे. भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करण्यात बांगलादेशी गोलंदाजांना यश आले आहे.

शिखर धवन पाठोपाठ मुरली विजयनेही कसोटीतील शतक पूर्ण केले. पण शाकिब अल हसनने धवनला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. धवनने 175 धावांची खेळी केली. धवननंतर मैदानात आलेला रोहित शर्मा फार काळ टिकला नाही. अवघ्या 6 धावांवर खेळत असताना शाकिबने त्याचा त्रिफळा उडवला. तर कर्णधार कोहलीलाही झुबेरने अवघ्या 14 धावांवरच तंबूत परतवले. त्यानंतर मुरली विजय आणि राहणेने डाव सावरला आहे. विजयने दीडशतक पूर्ण केले पण तो पुढे सरकू शकला नाही. 150 धावांवर असताना तो बाद झाला. तर राहणेचे शतक अवघ्या दोन धावांनी हुकले.

धवनचे 23 चौकार
शिखर धवनने 158 चेंडूंमध्ये 150 धावा केल्या. त्यामध्ये 21 चौकारांचा समावेश होता. संपूर्ण खेळीत त्याने 24 चौकार खेचले. तर दुसऱ्या बाजुने मुरली विजयनेही त्याला चांगली साथ दिली. विजयने कसोटी कारकिर्दीतील शतक पूर्ण केले. त्यात 10 चौकार आणि एक षटकार यांचा समावेश होता.