आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • The First Captain Virat Kohli Of The World, Who Scored 10 Centuries In A Single Session

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसरी कसाेटी/ तिसरा दिवस; एकाच सत्रात 10 शतके ठाेकणारा काेहली जगातील पहिला कर्णधार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाच्या कर्णधार विराट काेहलीने (२१३) विक्रमी खेळी केली. यामुळे यजमान भारताने रविवारी दुसऱ्या कसाेटीत श्रीलंकेसमाेर धावांचा डाेंगर रचला. काेहली अाणि राेहित शर्मा यांच्या १७३ धावांच्या भागीदारीच्या बळावर भारताने  ६१० धावांवर अापला पहिला डाव घाेषित केला. यासह यजमानांकडे अाता ४०५ धावांची अाघाडी अाहे. दुसऱ्या डावात श्रीलंकेने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद २१ धावा काढल्या. अाता डावाने पराभव टाळण्यासाठी पाहुण्या श्रीलंकेला अजून ३८४ धावा काढाव्या लागतील.

 

 भारताकडून ईशांत शर्माने एक विकेट घेतली. त्याने सलामीवीर समरविक्रमाला (०) अाल्यापावली पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यामुळे दुसऱ्या डावात श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात झाली. करुणारत्ने (११) अाणि थिरिमाने (९) हे मैदानावर खेळत अाहेत. त्यामुळे टीमला या दाेघांकडून माेठ्या खेळीची अाशा अाहे.   


काेहलीचे पाचवे द्विशतक

टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने संयमी खेळी करताना श्रीलंकेची गाेलंदाजी फाेडून काढली. यातून त्याने अापल्या करिअरमधील पाचवे द्विशतक ठाेकले. त्याने २६७ चेंडूंचा सामना करताना १७ चाैकार व २ षटकारांच्या अाधारे २१३ धावांची शानदार खेळी केली. काेहलीने यंदाच्या सत्रामध्ये विक्रमी शतकांचा पल्ला गाठला. त्याचे हे १० वे शतक ठरले. कर्णधाराच्या भूमिकेत दहा शतके पूर्ण करणारा काेहली हा जगातील पहिला फलंदाज ठरला. त्याचे हे करिअरमधील १९ वे कसाेटी अाणि ५१ वे अांतरराष्ट्रीय शतक ठरले.   


गावसकरांपेक्षा अधिक शतके

काेहलीने कर्णधार म्हणून १२ वे कसाेटी शतक ठाेकले. यासह त्याने अापल्याच देशाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना मागे टाकले. गावसकरांच्या नावे ११ शतके अाहेत.

 

एकाच डावात पाच दिग्गजांचा विक्रम ब्रेक; एकाशी साधली बराेबरी  
जबरदस्त फाॅर्मात असलेल्या कर्णधार विराट काेहलीने तुफानी खेळी करताना द्विशतकाचा पल्ला गाठला. यादरम्यान त्याने एकाच डावात पाच दिग्गजांना पिछाडीवर टाकण्याचा पराक्रम गाजवला. याशिवाय त्याने विक्रमामध्ये एकाची बराेबरीही साधली.

 

तिसऱ्यांदा पहिल्याच डावात भारताचे चार शतकवीर
यजमान टीम इंडियाकडून अाघाडीच्या फलंदाजांनी अापल्या घरच्या मैदानावर मनसाेक्त फटकेबाजी केली. त्यामुळे चार फलंदाजांना शतकी खेळीची नाेंद करता अाली. यामध्ये सलामीवीर मुरली विजय (१२८), चेतेश्वर पुजारा (१४३), काेहली अाणि राेहित शर्माचा समावेश अाहे. असे तिसऱ्यांदा घडले. यापूर्वी २००७ मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध अाणि दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध काेलकाता कसाेटीत हा पराक्रम भारतीय फलंदाजांनी गाजवला अाहे.

 

डाॅन ब्रॅडमॅनपेक्षाही सर्वाेत्तम कन्व्हर्जन रेट
काेहलीने कर्णधाराच्या भूमिकेत १६ वेळा ५० च्या स्काेअरवरून पुढे खेळला अाणि  १२ वेळा शतके ठाेकली. त्याने ७५ टक्के ५० प्लस स्काेअरला शतकात बदलवून टाकले. दिग्गज क्रिकेटपटू ब्रॅडमॅनचा कन्व्हर्जन रेट ६७ टक्के हाेता.  यात अाता काेहली हा वरचढ ठरत अाहे.

 

सचिनपेक्षा कमी डावांत १९ शतके 
काेहलीचे हे कसाेटीतील १९ वे शतक ठरले. त्याने १०४ डावांत हा पल्ला गाठला. कसाेटीत सर्वाधिक ५१ शतके ठाेकणाऱ्या सचिनला अापले १९ वे शतक १०५ व्या डावात पूर्ण करता अाले हाेते. ब्रॅडमॅन यांच्या नावे ५३ डावांत १९ शतकांची नाेंद अाहे.   


लारासाेबत पाच द्विशतकांची बराेबरी
भारताच्या काेहलीने कर्णधाराच्या भूमिकेत कसाेटी क्रिकेटमध्ये पाचवे द्विशतक ठाेकले. त्याने विंडीजचा दिग्गज लाराच्या विक्रमाची बराेबरी साधली. याला मागे टाकण्याचा काेहलीचा मानस अाहे. 

बातम्या आणखी आहेत...