आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPLमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्स बरोबर धोनीसह अन्य खेळाडूंचे पुनर्वसन निश्चित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेली दोन वर्षे बाद करण्यात आलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला आगामी आयपीएलमधील पुनर्प्रवेशाबरोबरच आपापले पाच दिग्गज खेळाडू कायम राखण्याचा हक्कही मिळाला आहे. आज नवी दिल्ली येथे आयपीएल कौन्सिलने प्रशासक मंडळाबरोबर झालेल्या बैठकीत फ्रँचायझींना लिलावादरम्यान खर्चाची मर्यादा ६६ कोटींवरून ८० कोटींपर्यंत वाढवून दिली. खेळाडू कायम राखण्याबाबत आणि त्यांच्या मानधनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वेही आज निश्चित करण्यात आली.


आयपीएल कौन्सिलच्या निर्णयामुळे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आपल्या चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधित्व करता येईल. रॉयल्सच्या पाच खेळाडूंनाही आपल्या संघाच्या बॅनरखाली खेळता येईल. लिलाव प्रक्रियेआधी यापुढे प्रत्येक संघाला तीन खेळाडूंना ‘प्री फ्लेअर ऑक्शन’च्या आधारे संघात कायम ठेवता येईल.

 

आयपीएल कौन्सिलचे निर्णय

- खेळाडू कायम राखणे आणि अनुरूपता या दोन्हीव्यतिरिक्त प्रत्येक फ्रँचायझीला भारताचे प्रतिनिधित्व केलेले तीन खेळाडू, तीन परदेशी खेळाडू आणि दोन भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू घेण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.
- खेळाडूंना कायम ठेवताना पहिल्या खेळाडूच्या मानधनाची मर्यादा १५ कोटी, दुसऱ्याची ११ कोटी, तर तिसऱ्याची ७ कोटी एवढी ठेवण्यात आली आहे.
- ‘राइट टू मॅच’ (अनुरूपता) द्वारे लिलावाआधी संघात घेतल्यास पहिल्या खेळाडूच्या मानधनाची मर्यादा साडेबारा कोटी, तर दुसऱ्या खेळाडूच्या मानधनाची मर्यादा साडेआठ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. तिसऱ्या पर्यायात मर्यादा साडेबारा कोटी रुपयांची ठेवण्यात आली आहे.
- लिलावासाठीची पायाभूत रक्कमही वाढवण्यात आली आहे. भारताचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या खेळाडूस १० ऐवजी २०, २० ऐवजी ३०, तर ३० ऐवजी ४० लाख रुपये बोलीआधीची पायाभूत रक्कम निश्चित झाली.

 

> यंदापासून सलग सात सामन्यांत न खेळणाऱ्या खेळाडूस अन्य फ्रँचायझीतर्फे खेळण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...