आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Indian Women Cricket Team Defeat The South Africa In World Cup Qualify Competition

भारतीय महिलांचा द. आफ्रिकेवर विजय; महिला वर्ल्डकप क्वालिफायर स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - कर्णधार मिताली राज (६४) आणि मोना मेश्राम (५५) यांच्या दमदार फलंदाजीनंतर शिखा पांडेच्या ४ आणि एकता बिष्टच्या ३ विकेटच्या बळावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला ४९ धावांनी हरवले. भारताने यासह आयसीसी महिला विश्वचषक क्वालिफायर क्रिकेटच्या सुपरसिक्समध्ये विजयाने सुरुवात केली. भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २०५ धावांचा स्कोअर उभा केला. यानंतर भारतीय महिला गोलंदाजांनी द. आफ्रिकेला १५६ धावांत रोखले. 
 
मिताली आणि मोना मेश्राम यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. वेदा कृष्णमूर्तीने १८, देविका वैद्यने १९ आणि शिखा पांडेने २१ धावांचे योगदान दिले. द. आफ्रिकेसाठी मारिजेम कॅपने २३ धावांत २ तर अयाबोंगा खाकाने ४४ धावांत २ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने धक्का दिला. शिखाने ३४ धावांत ४ गडी बाद करून आफ्रिकेचे कंबरडे मोडले. तिने आफ्रिकेच्या अखेरच्या दोन फलंदाजांना सलग दोन षटकांत बाद करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. फिरकीपटू एकता बिष्टने २२ धावांत ३ गडी बाद केले. द. आफ्रिकेकडून कॅपने २९ धावा आणि कर्णधार डेन वान निकर्कने २० धावांचे योगदान दिले.
बातम्या आणखी आहेत...