आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी सलामीवीर ही डोकेदुखी : कुंबळे ; चौथी कसोटी गुरुवारपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘भारताला अद्याप सलामीची निश्चित जोडी मिळाली नाही. कारण शिखर धवन, के. एल. राहुल हे दोघे जखमी असल्याने भारताची अडचण वाढली. राहुल आणि मुरली विजय जखमी झाल्यानंतर तंदुरुस्त होऊन संघात परतले. गंभीरला फॉर्म गवसला नाही, तरीही भारताने मालिकेत आघाडी घेतली हे कौतुकास्पद आहे,’ असे टीम इंडियाचा मुख्य कोच अनिल कुंबळेने मंगळवारी वानखेडे स्टेडियम संघाच्या सरावादरम्यान सांगितले. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली तरीही भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या चेहऱ्यावर मुंबई कसोटीच्या पार्श्वभूमीवर काळजीच्या छटा स्पष्ट दिसत होत्या.

पहिल्या कसोटीत गंभीर-मुरली विजय, दुसऱ्या कसोटीत राहुल-मुरली विजय, तिसऱ्या कसोटीत पार्थिव-विजय अशा तीन वेगवेगळ्या सलामीच्या जोड्या भारताकडून खेळल्या. खेळाडूंचे फिटनेस आणि दुखापती गंभीर समस्या असल्याचे कुंबळे यांनी या वेळी मान्य केले. संघात फिटनेसच्या, दुखापतीच्या समस्या कायम आहेत. गोलंदाजी चांगली आहे. फक्त एकदाच ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी एकाच गोलंदाजाला घेता आले. यावरून गोलंदाजीत सर्वच गोलंदाज आपापले योगदान देत आहेत. मुरली विजयने न्यूझीलंडविरुद्ध आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत शतकी डाव केले. मात्र, तो त्यानंतर आखूड टप्प्याच्या चेंडूवर त्याच पद्धतीने बाद झाला म्हणून त्याचा तो ‘वीकनेस’ आहे, असे त्याला कुणी हिणवू नये, अशी विनंती या वेळी कुंबळे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...