Home »Sports »From The Field» The Last Match Against Australia

वनडे मालिका : नागपूरच्या व्हीसीए मैदानावर अाज अाॅस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना रंगणार

जबरदस्त फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ अाता रविवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर मालिकेचा समाराेप विजयी चाैकाराने करण्

वृत्तसंस्था | Oct 01, 2017, 03:00 AM IST

  • वनडे मालिका : नागपूरच्या व्हीसीए मैदानावर अाज अाॅस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना रंगणार
नागपूर-जबरदस्त फाॅर्मात असलेला यजमान भारतीय संघ अाता रविवारी नागपूरच्या व्हीसीए मैदानावर मालिकेचा समाराेप विजयी चाैकाराने करण्यासाठी उत्सुक अाहे. अाता मालिकेतील पाचव्या अाणि शेवटच्या वनडेत भारत अाणि अाॅस्ट्रलिया समाेरासमाेर असतील. याच विजयी चाैकाराच्या बळावर टीम इंडियाला पुन्हा एकदा अायसीसीच्या वनडे क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर विजराजमान हाेण्याची संधी अाहे. गत सामन्यातील पराभवाने भारताने हे सिंहासन गमावले हाेते.

भारताने सलगच्या तीन विजयाच्या बळावर मालिका जिंकली. मात्र, गत सामन्यात बाजी मारून अाॅस्ट्रेलियाने विजयाचे खाते उघडले. यासह अाॅस्ट्रेलियाने भारताची सलग विजयाची मालिकाही खंडित केली. अाता मालिकेत चाैथ्या विजयासाठी भारतीय संघ सज्ज अाहे. दुसरीकडे मालिका पराभवाने अचडणीत सापडलेला अाॅस्ट्रेलियन संघ अाता अापली प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रयत्नशील अाहे. यासाठी अाता शेवटचा सामना जिंकून दाैऱ्याचा शेवटही गाेड करण्यासाठी अाॅस्ट्रेलियन खेळाडू उत्सुक अाहेत. मात्र, त्यासाठी या टीमला माेठी कसरत करावी लागेल. कारण यजमान टीम इंडियाचे लक्ष विजयी समाराेपाकडे लागले अाहे. त्यामुळे हा सामना अधिक राेमांचक हाेण्याची शक्यता अाहे. दाेन्ही संघांनी विजयासाठी कंबर कसली अाहे.
भारताला विक्रमाची संधी
- अाघाडीवर असलेल्या भारताला अाता चाैथा वनडे जिंकल्यास, पहिल्यांदा अाॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका ४-१ अापल्या नावे करता येईल.
- नागपुरातील विजयाने पहिल्यांदा भारताला काेणत्याही मालिकेत अाॅस्ट्रेलिया चार लढतीत पराभव करण्याची कामगिरी नाेंद करता येईल.
- भारताला तिसऱ्यांदा अाॅस्ट्रेलियाला पाच वा त्यापेक्षा अधिक वनडे मालिकेत अाॅस्ट्रेलियाला नमवण्याची कामगिरी नाेंदवता येईल. यापूर्वी भारताने १९८६ व २०१३ मध्ये भारताने कांगारूंचा पराभव केला अाहे.
- अाॅस्ट्रेलियावरच्या विजयाने १२० गुणांसह भारतीय संघ क्रमवारीत नंबर वन स्थान गाठू शकेल.
संभाव्य संघ
भारत :विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, धाेनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वरकुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, बुमराह, उमेश यादव, माे. शमी, अक्षर पटेल, लाेकेश राहुल.

अाॅस्ट्रेलिया :स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वाॅर्नर, कार्टराइट, ट्रेव्हिस हेड, मॅक्सवेल, स्टाेईनिस, मॅथ्यू वेड, अॅस्टाेन एगर, काने रिचर्डसन, पॅट कमिन्स, कुल्टर-नाइल, अॅराेन फिंच, हँडसकाेंब, फाॅकनर, अॅडम झम्पा.

Next Article

Recommended