आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या विजयाचा काेलकात्यात उदाे उदाे! दुसरा एकदिवसीय सामना अाज, पावसाचे सावट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता- फाॅर्मात असलेल्या विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया गुरुवारी नवत्राेत्सवाच्या पहिल्याच दिवशी काेलकात्यात विजयाचा उदाेउदाे करण्यासाठी उत्सुक अाहे. यजमान भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात एेतिहासिक ईडन गार्डन मैदानावर मालिकेतील दुसरा वनडे सामना हाेणार अाहे. यासाठी दाेन्ही संघ सज्ज झाले. या सामन्यातही बाजी मारून अापली विजयी लय कायम ठेवण्याचा टीम इंडियाचा मानस अाहे. दुसरीकडे सलामीच्या पराभवातून सावरलेल्या अाॅस्ट्रेलिया संघाची मालिकेत विजयी ट्रॅकवर येण्यासाठी धडपड असेल.  हार्दिक,
 
चहलवर सर्वांची नजर
सलामीच्या विजयाचे हीराे ठरलेल्या हार्दिक अाणि युवा गाेलंदाज यजुवेंद्र चहलवर दुसऱ्या वनडेत सर्वांची नजर असेल. यांच्याकडून अाता ईडन गार्डनवर उल्लेखनीय कामगिरीची अाशा अाहे. हार्दिकने सलामीच्या सामन्यात  शानदार अर्धशतक ठाेकले. याशिवाय ताे गाेलंदाजीतही चमकला. त्याने २ विकेट घेतल्या हाेत्या.  यजुवेंद्र चहलने तीन बळी घेऊन अाॅस्ट्रेलियाचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. 
 
सराव ‘पाण्यात’; पावसाचे सावट
टीम इंडियाच्या वनडे सामन्याच्या तयारीसाठी सरावावर पाणी फेरले. त्यामुळे बुधवारी भारताला सराव करता अाला नाही. मंगळवारीही  संघ पावसामुळे सराव करू शकला नाही. आजच्या सामन्यावरही पावसाचे सावट निर्माण झाले अाहे.
 
संभाव्य संघ 
भारत :
विराट काेहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, राेहित शर्मा, मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंग धाेनी, हार्दिक, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, लाेकेश राहुल, रवींद्र जडेजा, उमेश यादव, माे. शमी.  
अाॅस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वाॅर्नर, िहल्टन कार्टराइट, मॅथ्यू वेड, नॅथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, जेम्स फाॅकनर, ट्रेव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, रिचर्डसन, स्टाेईनिस, अॅराेन फिंच.
बातम्या आणखी आहेत...