आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Third One day International Match Against Bangladesh A

विजयाच्या लक्ष्याने भारत अ संघ आज उतरेल मैदानावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - बांगलादेश अ संघाविरुद्ध मालिका विजयाच्या लक्ष्याने भारत अ संघ रविवारी मैदानावर उतरेल. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत असून रविवारी मालिकेतील अखेरचा सामना होईल. यामुळे या सामन्याला फायनलचे स्वरूप आले आहे. दुसऱ्या वनडेच्या पराभवातून सावरून भारताचे खेळाडू दमदार प्रदर्शनाने मालिका विजयाचा प्रयत्न करतील, अशी आशा आहे. तिसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाला कमी लेखण्याची चूक भारताला करता येणार नाही.
फलंदाजांकडून आशा : भारत अ संघाला विजय मिळवायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांना जबाबदारीने मोठी खेळी करावी लागेल. भारत अ संघाकडे सर्वाधिक अनुभवी खेळाडू सुरेश रैना आहे. मात्र, तो दोन्ही सामन्यांत फ्लॉप झाला. मनीष पांडे, केदार जाधव आणि कर्णधार उन्मुक्त चंद यांना मोठी खेळी करावी लागेल. रैना सामन्यांत आगामी द. आफ्रिकेविरुद्ध मालिकेपूर्वी सरावासाठी ताे भारत अ संघाकडून खेळत आहे. प्रशिक्षक राहुल द्रविडला युवा खेळाडू संजू सॅमसन, गुरकिरत व ऋषी धवन यांच्याकडूनही मधल्या फळीत चांगल्या फलंदाजीची आशा आहे.

गोलंदाजांकडूनही आशा : गोलंदाजांच्या रूपात ऋषी धवन, गुरकिरत सिंग, श्रीनाथ अरविंद आणि कर्ण शर्मा यांच्याकडून दमदार गोलंदाजीचीही आशा आहे.
दोन्ही संघ असे
भारत अ : उन्मुक्त चंद (कर्णधार), मयंक अग्रवाल, मनीष पांडे, सुरेश रैना, केदार जाधव, संजू सॅमसन, करुण नायर, कुलदीप यादव, जयंत यादव, कर्ण शर्मा, ऋषी धवन, श्रीनाथ अरविंद, धवल कुलकर्णी, रुष कलारिया, गुरकिरत.

बांगलादेश अ: मोमिनुल हक (कर्णधार), नासिर हुसेन, अनामुल हक, रोनी तालुकदार, लिंटन दास, शब्बीर रहेमान, सौम्य सरकार, सकलेन साजिब, अराफत सनी, रुबेल हुसेन, शफिल इस्लाम, जुबेर हुसेन, अल अमीन हुसेन.