आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची नजर मालिका विजयाकडे, श्रीलंकेविरुद्ध अाज तिसरा वनडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लेकल - सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता कसाेटीपाठाेपाठ यजमान श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिकाही जिंकण्यासाठी उत्सुक अाहे. यासाठी कसाेटी कर्णधार विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचे खेळाडू सज्ज झाले अाहेत.
 
रविवारी पल्लेकलच्या मैदानावर भारत अाणि यजमान श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना रंगणार अाहे. अातापर्यंत भारताने सलगच्या दाेन विजयांच्या बळावर पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने अाघाडी घेतली. अाता तिसऱ्या विजयाच्या बळावर ही मालिका ३-० ने अापल्या नावे करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.  
 
तिसऱ्या वनडेदरम्यान विराट काेहलीला अनेक विक्रमांची संधी अाहे. त्यामुळे  हा विक्रमी पल्ला गाठण्याकडे त्याची नजर नजर लागली अाहे. दुसरीकडे यजमान श्रीलंका टीम सलगच्या पराभवामुळे घरच्या मैदानावर अडचणीत सापडली अाहे. त्यामुळे श्रीलंका टीमवर अाता घरच्या मैदानावर दुसऱ्या मालिका पराभवाचे सावट निर्माण झाले अाहे. यापूर्वी, यजमानांना लाजिरवाण्या पराभवामुळे कसाेटी मालिका गमवावी लागली. संथ गाेलंदाजीमुळे कर्णधार थरंगा अडचणीत सापडला अाणि त्याच्यावर दाेन सामन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात अाली. त्यामुळे अाता कपुगेदराच्या नेतृत्वाखाली श्रीलंका तिसऱ्या वनडेत खेळणार अाहे.

काेहली विक्रमाच्या उंबरठ्यावर
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाता तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरीचा पल्ला गाठू शकताे. यातून त्याला अापल्या नावे अनेक वनडे करिअरमध्ये विक्रमांची नाेंद करता येईल.  

नेतृत्वात मालिका विजयाची हॅट्ट्रिक
काेहलीला नेतृत्वात  मालिका जिंकण्याची हॅट्ट्रिक करता येईल. त्याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड  व  विंडीज (३-१) वनडे मालिका जिंकली. अाता श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका जिंकून हॅट्ट्रिकची संधी अाहे.

नेतृत्वात १० मालिका विजय
काेहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १० मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर अाहे. अातापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली भारताने कसाेटी अाणि वनडे  अशा एकूण ९ मालिका जिंकल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...