आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत 30 वर्षांपासून कसोटीत भारत अजेय; श्रीलंका विरुद्ध तिसरी कसोटी शनिवारपासून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय संघ शनिवारी जेव्हा दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध कसोटी लढतीसाठी उतरेल तेव्हा अनेक विक्रमांची त्यांना संधी आहे. भारतीय संघ या मैदानावर गेल्या ३० वर्षांपासून पराभूत झालेला नाही. त्यांच्याकडे आपला हा विक्रम कायम ठेवण्याची संधी आहे. त्याचप्रमाणे हा सामना जिंकून एका वर्षात सर्वाधिक चार कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. भारत आणि दक्षिण अाफ्रिकेने २०१७ मध्ये सर्वाधिक प्रत्येकी ३-३ कसोटी मालिका जिंकल्या आहेत.  


श्रीलंकेविरुद्ध सध्याच्या मालिकेत भारत १-० ने पुढे आहे. त्याने नागपूरमध्ये पाहुण्या संघाला एक डाव व २३९ धावांनी हरवले. भारतीय प्रेक्षक संघाचा फॉर्म व विक्रम पाहता   
विजयाची आशा ठेवून आहेत. यजमान भारताने कोटलाच्या मैदानावर गेल्या ११ कसोटीपैकी १० मध्ये विजय मिळवला आहे, एक कसोटी बरोबरीत राहिली. तो अखेरच्या वेळी १९८७ मध्ये वेस्ट इंडीजकडून पराभूत झाला होता. श्रीलंकेने येथे एकमेव कसोटी २००५ मध्ये खेळली होती. भारताने तो सामना १८८ धावांनी जिंकला होता. भारताने या मैदानावर एकूण ३३ कसोटी खेळल्या आहेत. यात १३ जिंकल्या आणि सहामध्ये पराभव झाला आहे.   

 

वर्षातील विक्रमी आठवी कसोटी जिंकण्याची संधी 
भारताने या वर्षी १० कसोटी सामने खेळले आहेत. कोटला कसोटी त्याची वर्षातील अखेरची कसोटी असेल. कोहलीच्या संघाने २०१७ मध्ये सर्वाधिक सात कसोटी जिंकल्या आहेत. दक्षिण आफ्रिका सहा विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेने ४ कसोटी जिंकल्या.

 

२ वर्षांपूर्वी अाफ्रिकेला हरवले
भारताने या मैदानावर धावसंख्येनुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय आहे. भारताने दोन वर्षांपूर्वी झालेल्या सामन्यात ३३७ धावांनी विजय मिळवला होता. भारताचा या मैदानावरील हा अखेरचा सामना होता.

 

अनिल कुंबळे मैदानाचा हीरो 
अनिल कुंबळेने कोटलावरच १० विकेट घेत या मैदानावर १९९९ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना एेतिहासिक केला. कुंबळेने पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात १० विकेट घेतल्या होत्या. अशी कामगिरी त्यापूर्वी इंग्लंडच्या जिम लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली आहे.

 

धवनचे पुनरागमन? रंगना हेराथ बाहेर
संघात एक-दोन बदल शक्य आहे. भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुलच्या जागी शिखर धवनला संधी मिळू शकते. पहिल्या कसोटीत त्याने ९४ धावा केल्या होत्या. बहिणीच्या लग्नामुळे तो दुसरी कसोटी खेळू शकला नाही. राहुलने दुसऱ्या कसोटीत सात धावा बनवून बाद झाला. त्याने पहिल्या कसोटीत ७९ धाव केल्या होत्या.  श्रीलंकेचा फिरकीपटू रंगना हेराथ दुखापतीमुळे खेळणार नाही. संघाने त्याच्या जागी जेफ्री वेंडरसेला स्थान दिले.

बातम्या आणखी आहेत...