आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांना आठवले युवीचे ते सहा चमत्कारिक सिक्सर, टि्वटरवर अशा प्रकारे केले चिअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार ऑलराउंडर युवराजसिंग भलेही टीम इंडियाच्या बाहेर असेल. मात्र तो त्याच्या चाहत्यांच्या नेहमीच स्मरणात राहतो. युवीने त्याच्या कारकिर्दीतील गाजवलेले काही खास पराक्रम तर, त्याचे चाहते विसरूच शकत नाही. नव्हे ते युवीला चिअर करण्याची कोणतीही संधी सोडत नाही.
भारतात युवराजसिंग #8yearsforyuvis6sixes नावाने ट्रेंड करत आहे. हो, बरोबर ओळखलं आपण, त्याने याच दिवशी बरोबर 8 वर्षांपूर्वी इंग्लंडविरूद्ध टी-20 वर्ल्ड कप-2007 मध्ये एका ओव्हरमध्ये सलग सहा सिक्सर मारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. एवढेच नाही तर, युवराजसिंगने याच सामन्यात टी-20 फॉरमॅटमध्ये फास्टेस्ट हाफ सेंच्युरी करण्याचा विक्रमही केला होता. त्याने हा विक्रम केवळ 12 चेंडूत केला.
बाहुबलीशी केली तुलना
काही क्रिकेट फॅन्सनी तर युवीची तुलना नुकत्याच प्रदर्शित झालेल्या साउथ इंडियन ब्लॉक बस्टर सिनेमा 'बाहुबली' तील नायक बाहुबलीशी केली आहे. लिहिले आहे - we salute u... SIXER + BOX OFFICE KING.'
युवराजसिंगने इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये सलग सहा सिक्सर ठोकले होते. त्यावेळी नॉन स्ट्राइकिंग एंडला खुद्द कर्णधार महेंद्रसिंह धोनी उभा होता. युवीच्या बॅटने रॉकेटसारखे उडणारे हे सिक्सर पाहतांना चाहत्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
पुढईल स्लाइड्सवर पाहा, क्रिकेट फॅन्सने अशा प्रकारे केले युवीला चिअर...