आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहलीच्या पाचव्यांदा वर्षात एक हजार धावा; श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत सरस कामगिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली- जबरदस्त फाॅर्मात असलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली एकापाठाेपाठ एका विक्रमी कामगिरीला गवसणी घालत अाहे. त्याने श्रीलंका  दाैऱ्यामध्ये यजमानांचा धुव्वा उडवणारा पहिला विदेशी संघ म्हणून भारताला मान मिळवून दिला. याशिवाय त्याने दाैऱ्यात सलग दाेन मालिका विजय मिळवून दिले. याच कर्तबगार कामगिरीसह विराट काेहलीने अापल्या वैयक्तिक खेळीनेही यशाचा पल्ला गाठला.  
 
विराट काेहलीने एका कॅलेंडर वर्षात पाचव्यांदा १ हजार धावांचा पल्ला गाठण्याची किमया साधली अाहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेमध्ये तुफानी खेळी केली. यामुळे त्याला एक हजार धावा पूर्ण करता अाल्या. त्याने २०१७ च्या सत्रामध्ये ९२.४५ च्या सरासरीने १०१७ धावा पूर्ण केल्या अाहेत. यामध्ये चार शतकांसह सहा अर्धशतकांचा समावेश अाहे. यातील दाेन शतके त्याने श्रीलंका दाैऱ्यामध्ये ठाेकले अाहेत.  

२०१७ मध्ये विराट कोहलीने १०१७ धावा केल्या पूर्ण 
विराट काेहली हा पाचव्यांदा एका सत्रामध्ये एकहजारी ठरला. त्याने यापूर्वी २०११ मध्ये १३८१ धावा, २०१२ मध्ये १०२६, २०१३ मध्ये १२६८, २०१४ मध्ये १०५४ धावा काढल्या अाहेत. अाता त्याने २०१७ मध्ये १०१७ धावा पूर्ण केल्या. अाता यामध्ये अधिक वाढ करण्यासाठी काेहली हा प्रयत्नशील राहणार अाहे.  
 
या सत्रात सर्वाधिक धावा करण्याची संधी
काेहलीला अाता एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम करण्याची संधी अाहे. कारण टीम इंडिया अागामी तीन महिन्यामध्ये   अाॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड अाणि श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार अाहे. यातून काेहलीला वैयक्तिक धावसंख्येत माेठी भर घालण्याची संधी अाहे.
बातम्या आणखी आहेत...