आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिंटू लुकाला सुवर्ण; भारत तिसऱ्या स्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान - नॅशनलरेकाॅर्ड हाेल्डर टिंटू लुकाने शेवटच्या दिवशी सुवर्णयाेग साधून २१ वी अाशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचा शेवट गाेड गेला. तिने रविवारी महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये सुवर्णपदकावर नाव काेरले. तिने २:०१.५३ सेकंदांमध्ये निश्चित अंतर पूर्ण केले. या स्पर्धेतील समाराेपाच्या पूर्वसंध्येला अाशियाई चॅम्पियनशिपमधील पदक विजेत्या ललित बाबरने सुवर्णपदक पटकावले. सोबत तिने अागामी रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे.
लुकाने यंदाच्या सत्रातील सर्वाेत्कृष्ट वेळची नाेंद अापल्या नावे केली. या सुवर्णपदकासह भारतीय संघाने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. भारताची ही मागील २००७ नंतरची सर्वात चांगली कामगिरी ठरली. या स्पर्धेत चीनने सर्वाधिक ४१ पदकांची कमाई करून अव्वल स्थान गाठले आहे.

भारताच्या टिंटू लुकाने उल्लेखनीय कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव काेरले. याच गटात चीनच्या झाअाे जिंगने (२:०३.४०) राैप्य अाणि श्रीलंकेच्या निमालीने (२:०३.९४) कांस्यपदक पटकावले. भारताच्या नावे सध्या सुवर्णपदक आहेत.

गाेल्डन चाैकार
भारतीयसंघाने या स्पर्धेत एकूण १३ पदकांसह तिसऱ्या स्थानावर धडक मारली. यात चार सुवर्णपदकांचा समावेश अाहे. तसेच पाच राैप्य अाणि चार कांस्यपदकेही भारताने जिंकली अाहेत. यात ललिता बाबर अाणि टिंटू लुकाने साेनेरी यश संपादन केले.
टाॅप-४ टीम सुवर्ण राैप्य कांस्य
चीन१५ १३ १३
कतार ०७ ०२ ०१
भारत०४ ०५ ०४
जपान०४ ०३ ११