आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • TNPL Match Chepauk Super Gillies And Dindigul Dragons Dindigul Captain R Ashwin

क्रिकेटर्स भिडले, रागात दिसला अश्विन; यूजर्स म्हणाले, क्रिकेट आहे की WWE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिंडीगुलचा कर्णधार अश्विन नॉन स्ट्रायकर एंड खेळत होता. तो पळत आला आणि वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, साई किशोर अश्विनवरच भडकला. - Divya Marathi
डिंडीगुलचा कर्णधार अश्विन नॉन स्ट्रायकर एंड खेळत होता. तो पळत आला आणि वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, साई किशोर अश्विनवरच भडकला.
चेन्नई- आयपीएलच्या धर्तीवर सुरु करण्यात तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये एका मॅचदरम्यान खेळाडू मैदानावरच भिडले. प्रकरण पाक हातघाईवर गेले. यादरम्यान पंचाने मधस्थी केली अन्यथा मारामारीची घटना घडली असती. या दरम्यान बॅटिंग करणारा टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन सुद्धा विरोधी संघाच्या खेळाडूंसमवेत वाद घालताना दिसला. या घटनेचे सोशल मीडियात मजेदार रिएक्शन पाहायला मिळाल्या. काय आहे हे प्रकरण...
- टीएनपीएलमधील दोन टीम चेपक सुपर जाईल्स आणि डिंडीगुल ड्रॅगन्स यांच्यात गुरुवारी रात्री झाली. यादरम्यान हा प्रकार घडला.
- त्यावेळी डिंडीगुलला जिंकण्यासाठी केवळ 6 धावांची गरज होती.
- चेपक सुपर जाईल्सचा स्पिनर आर. साई किशोरच्या एका बॉलवर डिंडीगुलचा फलंदाज जगदीशन नारायणने एक जोरदार शॉट मारला.
- शॉट बराच वेळ हवेत होता. त्यानंतर थर्ड मॅनच्या फील्डरने हा झेल घेतला व आनंद साजरा करीत बॉलरकडे पळाला.
- याचदरम्यान साई किशोरने बाद झालेल्या जगदीशनना काहीतरी उद्देशून म्हणाला, त्यामुळे दोघे हातघाईवर आले.

अश्विन पडला मध्ये-
- डिंडीगुलचा कर्णधार अश्विन नॉन स्ट्रायकर एंड खेळत होता. तो पळत आला आणि वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जगदीशन अश्विनवरच भडकला.
- अश्विनने बॉलर साईला काही ऐकवले. त्यानंतर जाईल्सचा कर्णधार आर. सतीश आणि इतर खेळाडूंनी पंचाच्या मदतीने या खेळाडूंना बाजूला नेले.
- मॅचनंतर प्रजेंटेशनदरम्यान अश्विन आणि सतीश दोघांनी मान्य केले की, सामना शेवटच्या क्षणावर पोहचल्याने एक्साइटमेंटमुळे ही घटना घडली. याला वेगळे वळण दिले जाऊ नये.
लोकांनी केले टि्वट-
- मॅचनंतर या घटनेबाबत अनेक लोकांनी खूप ट्वीट केली.
- एक यूजर म्हमाला, मी कळत नाही मी क्रिकेट पाहतोय की WWE ची फाईट?..
- आणखी एकर यूजर म्हणाला, अश्विनने लिप-रिएक्शनवर प्रश्न विचारला.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...