आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडिया उडवणार सलग मालिकेत श्रीलंकेचा धुव्वा; अाज पाचवा वनडे सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 काेलंबाे- सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेल्या टीम इंडियाला अाता वनडेमध्ये यजमान श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याची संधी अाहे. भाारत अाणि श्रीलंका यांच्यातील पाचवा वनडे सामना रविवारी काेलंबाेच्या मैदानावर रंगणार अाहे. भारताने अातापर्यंत पाच वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये ४-० ने विजयी अाघाडी घेतली. 
 

अाता पाचव्या विजयासाठी टीम इंडिया उत्सुक अाहे.  यासह भारतीय संघाच्या नावे विक्रमाची नाेंद हाेईल. ५-० ने विजय मिळवून भारतीय संघ हा यजमान श्रीलंकेला वनडेमध्ये क्लीन स्वीप देणारा पहिला विदेशी संघ ठरेल. कारण काेणत्याही टीमला अद्याप श्रीलंकेचा वनडे मालिकेत सुफडासाफ करता अालेला नाही. अाता हीच संधी भारतीय संघाला अाहे. यासाठी टीम इंडियाला एका विजयाची गरज अाहे.  
 

दुसरीकडे श्रीलंकन टीम अापल्या घरच्या मैदानावर विजय संपादन करून मालिकेचा शेवट गाेड करण्यासाठी उत्सुक अाहे. मात्र, त्यासाठी टीमला माेठी कसरत करावी लागेल. कारण भारतीय संघ सध्या जबरदस्त फाॅर्मात अाहे. जायबंदीमुळे श्रीलंका टीम अडचणीत सापडली अाहे. दुसरीकडे नेतृत्वामध्येही अनेक बदल हाेत अाहेत. याचा टीमला फटका बसण्याची शक्यता अाहे. त्यामुळे खेळाडूंना समाधानकारक खेळी करता अाली नाही. सध्या मलिंगावर सर्वांची नजर असेल. ताे निवृत्तीच्या वाटेवर अाहे. 
 

टीम इंडिया पाडणार सहाव्यांदा खुर्दा
भारतीय संघाने अातापर्यंत पाच वेळा पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्धीचा धुव्वा उडवला. अाता सहाव्यांदा हे यश संपादन करण्याची टीम इंडियाला संधी अाहे. भारताने यापूर्वी २००८-०९ मध्ये अापल्या घरच्या मैदानावर इंग्लंडचा, २०१०-११ मध्ये न्यूझीलंडचा, २०११-१२ मध्ये पुन्हा इंग्लंडचा अाणि २०१४-१५ मध्ये श्रीलंकेचा ५-० ने धुव्वा उडवला हाेता. अाता पुन्हा एकदा श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्यासाठी भारतीय संघ उत्सुक अाहे.
 
 
भारताला सलग अाठव्या विजयाची संधी 
भारताने श्रीलंका दाैऱ्यावर सात सामने जिंकले अाहेत. अाता सलग अाठव्या विजयाच्या उंबरठ्यावर अाहे. भारताने पहिला वनडे ९ गड्यांनी, दुसरा वनडे ३ गड्यांनी, तिसरा वनडे ६ गड्यांनी अाणि चाैथा वनडे १६८ धावांनी जिंकला.
बातम्या आणखी आहेत...