आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारत-ऑस्ट्रेलिया महिलांत सेमीफायनल, विजेता संघाची टक्कर फायनलमध्ये इंग्लंडसोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डर्बी- महिला क्रिकेट विश्वचषकात गुरुवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलची झुंज रंगेल. यातील विजेता संघ २३ जुलै रोजी होणाऱ्या फायनलमध्ये इंग्लंडसोबत खेळेल. ऑस्ट्रेलियन महिला सहा वेळेसचे चॅम्पियन असून भारतीय महिला संघासमोर तगडे आव्हान असेल. भारतीय महिला संघाने आतापर्यंत फक्त एकदाच २००५ मध्ये फायनल खेळले आहे.   
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय महिला संघाचे रेकॉर्ड अत्यंत सुमार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत झालेल्या ४२ सामन्यांत भारताचा ३४ मध्ये पराभव झाला. साखळी सामन्यांतही ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाला ८ विकेटने हरवले होते. मात्र, गुरुवारी होणाऱ्या सामन्यासाठी मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज आहे. या लढतीत ऑस्ट्रेलियाला हरवून साखळीतील पराभवाचा हिशेब चुकता करण्यास आतुर आहे. साखळीत ऑस्ट्रेलियाने ७ पैकी ६ सामने जिंकून दुसरे स्थान पटकावले तर भारतीय महिला संघाने साखळीत तिसरे स्थान पटकावले होते.   

या मैदानावर भारतीय महिला संघाने चार सामने खेळले असून मागच्या लढतीतही येथेच भारताने विजय मिळवला होता. हे मैदान आमच्यासाठी होम ग्राउंडप्रमाणे आहे. यामुळे आमच्या मुली गुरुवारच्या लढतीत आत्मविश्वासाने खेळतील, असे मिताली राजने म्हटले. भारतीय महिला संघ तुल्यबळ असला तरीही ऑस्ट्रेलियासुद्धा गोलंदाजी आणि फलंदाजीत प्रभावी आहे.  

दोन्ही संघ असे 
भारतीय महिला :
मिताली राज (कर्णधार), एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, मानसी जोशी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधना, मोना मेश्राम, शिखा पांडे, पूनम यादव, नुझत परवीन, पूनम राऊत, दीप्ती शर्मा, सुषमा वर्मा.  

ऑस्ट्रेलियन महिला : मेग लॅनिंग (कर्णधार), सराह अॅली, क्रिस्टिन बिम्स, अॅलेक्स ब्लॅकवेल, निकोल बोल्टन, ए. गार्डनर, राचेल हेन्स, अलिसा हिली, जिस जॉन्सेन, बेथ मोनी, इलिसी पेरी, मेगन स्कुट, बेलिंडा वाकरेवा, विलानी, अमंडा.
बातम्या आणखी आहेत...