आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेहलीच्या नेतृत्वात भारताला 11 व्या मालिका विजयाची संधी; अाज दुसरा T-20 सामना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकाेट- सलामीच्या विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या टीम इंडियाला अाता कर्णधार विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली ११ वी मालिका जिंकण्याची संधी अाहे. यासाठी यजमान भारतीय संघ अवघ्या एका पावलावर अाहे. भारत अाणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना शनिवारी राजकाेटच्या मैदानावर हाेणार अाहे. या सामन्यातील विजयाने भारताला अाता पाहुण्या न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका जिंकता येईल.
 
भारताने सलामी सामना जिंकून मालिकेमध्ये १-० ने अाघाडी घेतली अाहे. तसेच भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा हा सलग दुसरा मालिका विजय ठरेल. कारण, गत अाठवड्यात भारताने या टीमविरुद्धची वनडे सामन्यांची मालिका जिंकली. त्यामुळे सामन्यात सरस कामगिरी करण्यासाठी टीम इंडियाचे युवा खेळाडू उत्सुक अाहेत. दुसरीकडे न्यूझीलंड टीमने कमबॅकसाठी कंबर कसली. या सामन्याच्या तयारीसाठी या टीमने शुक्रवारी राजकाेटच्या मैदानावर कसून सराव केला. त्यामुळे सलग दुसरी मालिका गमावण्याची नामुष्की टाळण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल. गत सामन्यात या टीमला पराभवाला सामाेरे जावे लागले हाेते. भारताने हा सामना जिंकून न्यूझीलंडविरुद्ध पहिला विजय नाेंदवला.
 
काेहली ठरेल टाॅप स्काेअरर 
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली हा सध्या अांतरराष्ट्रीय टी-२० मध्ये जगातील दुसरा टाॅप स्काेअरर हाेण्याच्या उंबरठ्यावर अाहे. त्याच्या नावे १८७८ धावांची नाेंद अाहे. अाता यामध्ये १२ धावांची भर घालून काेहली हा दिलशानला मागे टाकू शकताे. दिलशानच्या नावे १८८९ धावा अाहेत.   
 
 
...तर भारत क्रमवारीत दुसऱ्या स्थानी
टीम इंडिया मालिका विजयाच्या बळावर अायसीसीच्या टी-२० क्रमवारीत माेठी प्रगती साधू शकेल. यामध्ये भारतीय संघाला दुसरे स्थान गाठण्याची संधी अाहे. सध्या भारतीय संघ पाचव्या स्थानावर अाहे. या मालिका विजयाने भारताच्या नावे १२० गुण हाेती. सध्या १२१ गुणांसह न्यूझीलंड टीम अव्वल स्थानावर अाहेत. त्यामुळे हे स्थान अधिक मजबूत करण्याचा न्यूझीलंड टीमचा प्रयत्न असेल. मात्र, या टीमला विजयाची गरज अाहे. 
 
सत्रात सर्वाधिक विजय संपादन करणारी टीम 
भारताला सत्रामध्ये सर्वाधिक विजय संपादन करणाऱ्या संघाचा बहुमान पटकावण्याची संधी अाहे.  या विजयाने भारताला सत्रामध्ये सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या विंडीजची बराेबरी साधता येईल. भारताने सत्रात ६ पैकी ४ टी-२० सामने जिंकले अाहेत. विंडीजच्या नावे ८ पैकी ५ सामने जिंकण्याची नाेंद अाहे.  
 
संभाव्य संघ 
- भारत : विराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, राेहित शर्मा, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंग धाेनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, माे. सिराज, यजुवेंद्र चहल.  
- न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, काेलीन मुन्राेे, राॅस टेलर, टाॅम ब्रुस, टाॅम लॅथम, हेन्री निकाेल्स, काेलीन डी ग्रँडहाेमे, मिचेल सॅटनर, ट्रेंट बाेल्ट, टीम साउथी, ईश साेढी.
बातम्या आणखी आहेत...