आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Run Scorer In T20 International Virat Kohli Is Top Indian Cricketer

हे आहेत T20 मधील टॉप 10 सुपरस्टार्स, विराट टॉप इंडियन, जगात 22 व्‍या क्रमांकावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्‍यान 2 अॉक्‍टोंबरपासून टी - 20 मालिकेला सुरूवात होणार आहे. तीन सामन्‍यांच्‍या या मालिकेत भारताचा विराट कोहली आणि साउथ अाफ्रिकेचा जेपी डुमिनी यांना नवीन विक्रम करण्‍याची संधी आहे. विराट भारताकडून टी20 मध्‍ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू आहे. डुमिनी त्‍यांच्‍या देशाकडून टॉप आहे.
विराट पुर्ण करू शकतो 1000 धावा
विराटने आतापर्यंत 28 सामन्‍यांमध्‍ये 972 टी20 इंटरनेशनल धावा काढल्‍या आहेत. त्‍यामुळे विराटकडे 1000 धावा पुर्ण करण्‍याची संधी आहे. त्‍याला केवळ 28 धावा करण्‍याची गरज आहे. टी20 मध्‍ये सर्वाधिक धावा बनवणा-या खेळाडूंच्‍या यादीत विराट 22व्‍या क्रमांकावर आहे.
दोघांना शतकाची प्रतिक्षा
विराट कोहली आणि साउथ अाफ्रिकाचा डुमिनी यांनी अजूनही टी20 मध्‍ये एकही शतक ठोकले नाही. विराटचा टॉप स्‍कोर 78* धावा आहेत. डुमिनीचा बेस्ट स्कोर 96* धावा आहे. त्‍यामुळे या दोन्‍ही खेळाडूंना या मालिकेत शतकाची प्रतिक्षा आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, टी 20 मध्‍ये सर्वाधिक धावा बनवणारे टॉप 10 फलंदाज..