लाहौर - पाकिस्तानमध्ये क्लब क्रिकेट मॅच दरम्यान बॉल लागल्याने तरुण क्रिकेटरचा मृत्यू झाला. जुबैर अहमद या क्रिकेटरला 14 ऑगस्ट रोजी क्लब मॅच दरम्यान बाऊन्सर लागला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) अधिकृत ट्विटर हँडलवर या घटनेची माहिती दिली आहे. पीसीबीने म्हटले आहे, की जुबेरचा मृत्यू पुन्हा एकदा आठवण करुन देत आहे की बॅटिंग दरम्यान हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. यापूर्वी फिल ह्यूज या क्रिकेटपटूचा शेफील्ड शील्ड टुर्नामेंट दरम्यान बाऊन्सर लागल्याने मृत्यू झाला होता.
सरावात डेव्हिड वाॅर्नर जखमी; हेझलवुडचा बाउन्सर लागला-
सिडनी- अाॅस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाज डेव्हिड वाॅर्नरला सराव सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली. सराव सामन्यात जाेश हेझलवुडने टाकलेला बाउन्सर हा वाॅर्नरला लागला. हा चेंडू लागल्याने ताे मैदानावर खाली पडला. ताे गंभीर जखमी झाला. मात्र, काही वेळच्या विश्रांतीनंतर त्याने मैदान साेडले. दरम्यानच्या घटनेमुळे खेळाडूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. अाता त्यावर हलकेसे उपचार करण्यात अाले. मात्र, काेणत्याही गंभीर दुुखापत नसल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून अाले अाहे. दाेन वर्षांपुर्वी, २०१४ मध्ये चेंडू मानेला लागल्याने अाॅस्ट्रेलियाच्या फिलीप ह्युजचा मृत्यू झाला हाेता.