आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 391 धावा काढत लंकेचा रोमांचक विजय, झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटीत 4 विकेटने विजयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो- श्रीलंकेने युवा खेळाडू डिकवेला आणि गुणारत्नेच्या शानदार प्रदर्शनाच्या बळावर झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव कसोटीत ४ विकेटने विजय मिळवला. श्रीलंकेने ३८८ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना थरारक विजय मिळवला. यजमानांच्या खेळाडूंनी दुसऱ्या सत्रात जबरदस्त फलंदाजी करून सामना संपवला. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ६ बाद ३९१ धावा काढल्या. दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून निरोशन डिकवेलाने ८१ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय असेला गुणारत्नेने नाबाद ८० धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा हा दुसरा मोठा स्कोअर ठरला आहे. मात्र, श्रीलंकेत हा धावांचा पाठलाग करताना सर्वांत मोठा स्कोअर आहे.   

चौथ्या दिवसाच्या ३ बाद १७० धावांवरून पुढे खेळताना श्रीलंकेने सकाळी कुशल मेंडिसची विकेट गमावली. त्याला क्रिमरने विल्यम्सकरवी ६६ धावांवर बाद केले. यानंतर मॅथ्यूजसुद्धा क्रिमरच्या गोलंदाजीवर २५ धावा काढून बाद झाला. ५ विकेट गमावल्यानंतर श्रीलंकेला पराभव स्पष्ट दिसत होता. मात्र, असेला गुणारत्ने अणि डिकवेलाने येथून सामना खेचून आणला आणि पराभव टाळला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. गुणारत्नेला ८१ धावांवर विल्यम्सच्या चेंडूवर चकाबवाने झेलबाद केले.  

डिकवेलाने आपली जबाबदारी पार पाडत दिलरुवान परेरासोबत श्रीलंकेला विजय मिळवून दिला. परेराने संकटाच्या वेळी नाबाद २५ धावा काढल्या. झिम्बाब्वेने पहिल्या डावात ३५६, तर श्रीलंकेने ३४६ धावा काढल्या होत्या. यानंतर १० धावांची आघाडी घेऊन झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात ३७७ धावा काढल्या. असेला गुणारत्ने मॅन ऑफ द मॅच तर रंगना हेराथ मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला.
बातम्या आणखी आहेत...