आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक सामन्यासाठी 10 पट वाढले जाहिरातींचे रेट, 30 सेकंदांचे 1 कोटी रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - लंडनच्या ओव्हलमध्ये रविवारी भारत-पाकिस्तान संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीची महाफायनल होणार आहे. याचे थेट प्रेक्षपण करणाऱ्या स्टार स्पोर्टसने आपल्या सर्व चॅनल्सवरील जाहिरातींचे दर 10 पट वाढवले आहेत. या चॅनल्सवर सामन्यादरम्यान दाखवण्यात येणाऱ्या 30 सेकंदांच्या जाहिरातीसाठी तब्बल 1 कोटी रुपये घेतले जात आहेत. एका जाहिरात कंपनीच्या अधिकाऱ्यानुसार, इतर दिवशी या चॅनल्सवर एवढ्याच वेळेच्या जाहिरातीसाठी 10 लाख रुपये चार्ज केले जातात.
 
उरलेल्या 10 टक्के स्लॉटसाठी आहे हा रेट...
वृत्तसंस्थेनुसार, सिरीज सुरू होण्याआधीच स्टार स्पोर्टसने जाहिरातींचा 90 टक्के स्लॉट बनवला होता. दहापट वाढलेली किंमत उरलेल्या 10 टक्के टाइम स्लॉटसाठी आहे.
- ज्या कंपन्यांनी अगोदर बुकिंग केली त्यांच्यात निसान मोटर्स, इंटेल, एमिरिट्स, ओप्पो आणि एमआरएफ सामील आहेत.
 
हेही जरूर वाचा
 
बातम्या आणखी आहेत...