आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Twitter Reactions After BCCI Postpones India V New Zealand Odi Due To Karwa Chauth

करवा चौथमुळे मॅच पुढे ढकलली, सोशल मीडियात आल्या या Funny कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- BCCI ने भारत आणि न्यूझीलँड यांच्यात होणारा वनडे मालिकेतील एक मॅचची तारीख एका दिवसाने वाढवली आहे. 19 ऑक्टोबरला करवा चौथ हा उत्तर भारतीय सण असल्याने मॅच एक दिवस पुढे ढकलली आहे. आता ही मॅच 20 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर होईल. ट्विटरवर उडवली जातेय खिल्ली...
- बीसीसीआयच्या या निर्णयानंतर हा टॉपिक ट्विटरवर ट्रेन्ड करतोय. फॅन्सने म्हटले की, हे फक्त भारतातच घडू शकते.
- एक फॅनने ट्विट केले की, ‘हा रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाचा पहिला करवा चौथ आहे. डोन्ट अंडरएस्टिमेट पावर ऑफ सर जडेजा.’
यामुळे बदलली तारीख-
- बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि डीडीसीएचे उपाध्यक्ष सी. के. खन्ना यांनी सांगितले की, ‘आम्ही या सामन्याला एक दिवस पुढे ढकलण्याची विनंती केली होती. बीसीसीआयने ही विनंती मान्य केल्याने आम्ही आभारी आहोत.
- मला कार्यालयात ही विनंती मान्य झाल्याचे पत्र मिळाले आहे.’
- डीडीसीएने बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांना पत्र लिहून विनंती केली की, 19 ऑक्टोबर रोजी करवा चौथ आहे. उत्तर भारतात हा सण मोठ्या संख्येने साजरा केला जातो.
- यामुळे 19 ऑक्टोबर रोजी सामना आयोजित केल्यास येणाऱ्या संभाव्य अडचणी सांगितल्या.
- करवा चौथमुळे सामन्याच्या तिकीट विक्रीवरही परिणाम पडू शकतो, असे डीडीसीएने सांगितले.
- यानंतर बीसीआयने ही विनंती मान्य केली.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, काय काय आल्या फनी कमेंट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...