आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीडशतक ठोकताच राहुल झळकला टि्वटरवर, अशा आल्या Reactions

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका फॅन्सने टि्वट करून फिटनेससाठी कधी कधी बियरची उपयोगी ठरते हे राहुलने दाखवून दिले असे म्हटले आहे. - Divya Marathi
एका फॅन्सने टि्वट करून फिटनेससाठी कधी कधी बियरची उपयोगी ठरते हे राहुलने दाखवून दिले असे म्हटले आहे.
स्पोर्ट्स डेस्क- भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने संधी मिळताच शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुरली विजय दुखापतग्रस्त झाल्याने संघात स्थान मिळालेल्या राहुलने दुस-या कसोटीतील पहिल्या डावात दमदार 158 धावांची खेळी आहे. त्याआधी दोन सराव सामन्यातही राहुलने अर्धशतके झळकावून आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले होते. मात्र, संघ व्यवस्थापनाने नवख्या राहुलऐवजी अनुभवी मुरली विजयला संधी दिली होती. मात्र, आपणही गुणवत्तेत कोठेही कमी नाही हे राहुलने दाखवून दिले आहे. टि्वटरवर राहुलची चर्चा...
- लोकेश राहुलने मॅचच्या पहिल्या दिवशी 75 धावा केल्या होत्या. दुस-या दिवशी शतक ठोकताच तो ट्विटरवर झळकू लागला.
- एक फॅनने या दौ-यावर असताना त्याच्या आलेल्या बीयर फोटोसमवेत टि्वट केले आहे.
- दुसरीकडे, राहुलच्या खेळीचे माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी कौतूक केले आहे.
- राहुलने शतक ठोकण्यासाठी केवळ 182 चेंडू घेतले. यादरम्यान त्याने 12 चौकार आणि एक षटकार खेचला.
- सहा कसोटीतील राहुलचे हे तिसरे शतक आहे. ही तीनही शतके त्याने परदेशात काढली आहेत.
- सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया, नंतर श्रीलंकेत आणि आता वेस्ट इंडिजमध्ये त्याने ही शतके काढली आहेत.
- राहुलच्या दीडशतकी खेळीमुळे दुस-या दिवसअखेर भारताने 5 बाद 358 धावा केल्या आहेत. तसेच भारताकडे आता 162 धावांची मजबूत आघाडी आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लोकेश राहुलच्या शतकानंतर काय काय आली आहेत टि्वटस....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...