आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Two Years Ago MS Dhoni\'s Suddenly Declared Retirement From Test Cricket, Now Captancy

2 वर्षापूर्वीही धोनीने असाच दिला होता अचानक धक्का, ...रडला होता विराट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंह धोनीने अखेर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधूनही कर्णधारपद सोडण्याची घोषणा बुधवारी केली. - Divya Marathi
कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंह धोनीने अखेर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधूनही कर्णधारपद सोडण्याची घोषणा बुधवारी केली.
स्पोर्ट्स डेस्क- कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंह धोनीने अखेर एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधूनही कर्णधारपद सोडण्याची घोषणा बुधवारी केली. दोन वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी 2014 तो शेवटची कसोटी सामना खेळला होता. तेव्हाही आताच्या प्रमाणे अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करून धोनीने क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. आताही धोनीने आपल्या चाहत्यांना असाच धक्का दिला आहे.
 
विराटला जानेवारी 2015 मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत शेवटच्या कसोटीत नेतृत्व करण्याची संधी मिळाली. 26 ते 30 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नला झालेली तिसरी कसोटी धोनीच्या कारकिर्दमधील शेवटची ठरली होती. चार कसोटी मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये धोनीने नेतृत्व केले होते.  धोनीनंतर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व उपकर्णधार असलेल्या विराट कोहलीकडे सोपवण्यात आले होते. मात्र, हे एवढे अचानक घडले की, आपल्यावर नवी जबाबदारी टाकल्याचे कळताच विराटला रडू कोसळले होते.
 
विराटने एका इंटरव्ह्यूमध्ये खुलासा केला होता की, नव्या जबाबदारीचे वृत्त कानावर पडताच त्याला रडू कोसळले होते. खांद्यावर अचानक पडलेली मोठी जबाबदारी आपल्याकडून पेलवली जाईल की नाही, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. धोनीच्या निर्णयाने आम्ही मूळापासून हादरून गेलो होतो. इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणाला होता विराट?...
 
- धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर माझ्यावर मोठी जबाबदारी आली. खरे सांगायचे तर, संघाचे नेतृत्व करावे लागेल, असा विचारच कधी मनात आला नव्हता. 
- ऑस्ट्रेलियामध्ये यादरम्यान विराटची गर्लफ्रेंड अनुष्काही होती. विराटने तिला नव्या जबाबदारीविषयी सांगितले. त्यावेळी त्याचे डोळे पाणावले होते. तिलाही आश्चर्याचा धक्का बसला होता.
- भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र भारतीय संघाचा कर्णधार होईल, असे त्याला कधीच वाटले नव्हते. विशेषतः एवढ्या कमी वयात.
- आता मात्र दोन वर्षांनंतर त्याच्या कर्णधारपदाच्या कामगिरीचे मूल्य केले तर त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने सलग 5 कसोटी मालिका जिंकल्या आहेत तसेच 18 कसोटीत एकही पराभव पाहिलेला नाही.
- धोनी महान खेळाडू आहे. त्याच्या समकालीन क्रिकेटरमध्ये अनेक महान, दिग्गज खेळाडू होते. मात्र त्यांच्याबरोबरीने त्याने आपली छाप क्रिकेटजगतात सोडली. धोनीसोबत खेळलेल्या आणि त्याच्या अगोदर निवृत्त झालेल्या काही दिग्गज व धोनीच्या आकडेवारीवर नजर टाकूया....
 
पुढे स्लाईडद्वारे टाकूया, धोनी व इतर दिग्गज खेळाडूंच्या आकडेवारीवर नजर....
बातम्या आणखी आहेत...