आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • U19 World Cup 2016: Australia Withdraw From This Tournament

ऑस्ट्रेलियाची अंडर-19 वर्ल्ड कपमधून माघार, म्‍हटले- बांगलादेश सुरक्षित नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- ऑस्ट्रेलियाने अंडर-19 वर्ल्ड कप-2016 मधून माघार घेतली. या माघारीमागे सुरक्षिततेचा हवाला देतांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सुदरलंड म्हणाले, "आमचे पहिले प्राधान्य संघ आणि कर्मचाऱ्यांना असते. बांगलादेशातील सुरक्षिततेच्या मुद्यावर सरकार दुविधेत आहे. यामुळे आम्ही या टूर्नामेंटमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आयसीसीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. बांगलादेशातील परिस्थिती पाहता, तेथे जाणे योग्य ठरणार नाही."
या मुळे घेतला टूर्नामेंट न खेळण्याचा निर्णय...
सीएने 3 सदस्यीय कमिटीला बांगलादेशमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बांगलादेशात पाठवले होते. या नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सिक्युरीटी डिपार्टमेंटचे प्रमूख सीन कॅरॉल यांनी मागील आठवड्यात बांगलादेश टूरच्या संदर्भात एक अहवाल सादर केला होता. या अहवालात त्यांनी बांगलादेशमधील स्थिती ऑस्ट्रेलियासाठी चांगली नाही असे सांगितले होते. ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड कप-2016 साठी ग्रुप-डीमध्ये आहे. या शिवाय ग्रुपमध्ये भारत, नेपाळ आणि न्यूझिलंड हे संघ आहेत.