आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेश यादव चमकला; ऑस्ट्रेलिया 9 बाद 256, उमेशने घेतल्या 4 विकेट; फिरकीपटूही तळपले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करताना पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अवघ्या २५६ धावांत ऑस्ट्रेलियाचे ९ गडी बाद केले. भारताकडून वेगवान गोलंदाज उमेश यादवने शानदार गोलंदाजी करताना ३२ धावांत ४ गडी बाद केले. याशिवाय फिरकीचे त्रिकूट रवीचंद्रन अश्विन (५९ धावांत २ विकेट), रवींद्र जडेजा (७४ धावांत २ विकेट) आणि जयंत यादव (५८ धावांत १ विकेट) यांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाकडून २० वर्षीय सलामीवीर रेनशॉने ६८ अाणि मिशेल स्टार्कने नाबाद ५७ धावा काढल्या.  
 
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या जगातील नंबर दोनची टीम ऑस्ट्रेलियाने ८२ धावांची सलामी दिली. सकाळी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाज दबाव निर्माण करू शकले नाहीत. जेवणाच्या ब्रेकनंतर डेव्हिड वॉर्नर ३२ धावा काढून बाद झाला. फिरकीपटू जयंत यादवने शाॅन मार्शला कोहलीकरवी झेलबाद केले.
 
यानंतर आलेला पीटर हँड्सकोंबही खास कामगिरी करू शकलेला नाही. त्याने ४५ चेंडूंत ३ चौकारांसह २२ धावा काढल्या. जडेजाने त्याला पायचित केले.  ऑस्ट्रेलियाने जेवणाच्या ब्रेकनंतर तीन विकेट १७ धावांच्या अंतरात गमावल्या.
 
हँडसकोब आणि कर्णधार स्टिवन स्मिथ १४९ च्या स्कोअरवर बाद झाले. स्मिथने केवळ २७ धावा काढल्या. भारतीय ऑफस्पिनर आर. अश्विनने कर्णधार विराट कोहलीकरवी स्मिथला झेलबाद केले. १६६ च्या स्कोअरवर मिशेल मार्श बाद झाला. दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने ६९ धावा काढून ३ विकेट गमावल्या. 
 
अखेरच्या सत्रात ५ विकेट 
चहापानानंतर मिशेल मार्श, मॅथ्यू वेड, रेनशॉ, स्टिव ओकिफे आणि नॅथन लॉयन यांच्या विकेट पडल्या. जडेजाने मिशेल मार्शला पायचित केले. तर उमेश यादवने वेडला पायचित केले. रेनशॉने अश्विनच्या गोलंदाजीवर मुरली विजयकडे झेल दिला. ओकिफे आणि लॉयन ८२  व्या षटकात सलग दोन चेंडूंवर बाद झाले.  
 
उमेश यादव  चौथ्यांदा चार विकेट घेतल्या
फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर गोलंदाज उमेश यादवने शानदार रिवर्स स्विंग गोलंदाजी केली. खेळपट्टी कशीही असली तरीही विकेट घेता येतात, हे त्याने सिद्ध केले. उमेश यादवच्या नावे आता २८ कसोटीत ७५ विकेट झाल्या आहेत. कसोटीत चौथ्यांदा डावात ४ विकेट घेतल्या.  त्याने एकदा पाच विकेट (वि. ऑस्ट्रेलिया, पर्थ-२०१२) घेतल्या आहेत. 
 
स्मिथ झे. कोहली गो. अश्विन (२७)
जगातील नंबर वन गोलंदाजाच्या चेंडूवर नंबर वन फलंदाजाचा, नंबर दोन फलंदाजाने घेतलेला झेल म्हणजे स्मिथची विकेट.
 
भारताने मोडला पाकचा विश्वविक्रम  
भारताने पुणे कसोटीत खेळताना पाकिस्तानकडून सर्वाधिक (७९) कसोटी मैदानावर खेळण्याचा विश्वविक्रम मोडला. पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर हा पहिला कसोटी सामना आहे. भारतात कसोटीचे आयोजन करणारे हे २५ वे मैदान ठरले. पुण्यात भारताने सर्वाधिक ८० कसोटी मैदानावर खेळण्याचा विश्वविक्रम केला.
 
- सलग २४ व्या कसाेटीत कोहलीने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला.  
 
- ऑस्ट्रेलियाच्या स्मिथने भारतात टॉस जिंकला. भारतात ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्यांदा टॉस जिंकला. मात्र, मागच्या सर्व सामन्यांत ऑस्ट्रेलियाचा भारतात पराभव झाला होता.  
 
- उमेश यादवने पाचव्यांदा डेव्हिड वॉर्नरला बाद केले. त्याच्याशिवाय इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने सुद्धा वॉर्नरला ५ वेळा बाद केले आहे. वॉर्नरला जेम्स अँडरसनने सर्वाधिक ७ वेळा बाद केले.
 
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव    धावा     चेंडू     ४    ६
रेनशॉ झे. विजय गो. अश्विन    ६८    १५६    १०    १
वॉर्नर त्रि. गो. उमेश    ३८    ७७    ०६    ०
स्मिथ झे. कोहली गो. अश्विन    २७    ९५    ०२    ०
शॉन मार्श झे. कोहली गो. जयंत    १६    ५५    ०३    ०
हँडसकोंब पायचित गो. जडेजा    २२    ४५    ०३    ०
एम. मार्श पायचित गो. जडेजा    ०४    १८    ००    ०
वेड पायचित गो. उमेश    ०८    २०    ०१    ०
मिशेल स्टार्क नाबाद    ५७    ५८    ०५    ३
ओकिफे झे. साहा गो. उमेश    ००    १३    ००    ०
लॉयन पायचित गो. उमेश    ००    ०१    ००    ०
हेझलवूड नाबाद    ०१    ३१    ००    ०

अवांतर : १५. एकूण : ९४ षटकांत ९ बाद २५६ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-८२, २-११९, ३-१४९, ४-१४९, ५-१६६, ६-१९०, ७-१९६, ८-२०५, ९-२०५. गोलंदाजी : इशांत शर्मा ११-०-२७-०, आर. अश्विन ३४-१०-५९-२, जयंत यादव १३-१-५८-१, रवींद्र जडेजा २४-४-७४-२, उमेश यादव १२-३-३२-४.
    
- मॅट रेनशॉॅ (६८) आशियात अर्धशतक ठोकणारा सर्वांत तरुण ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. त्याने २० वर्षे ३३२ दिवशी अर्धशतक काढले.
बातम्या आणखी आहेत...