आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Umpire Called Dead Ball When Suresh Raina Bowled

सरळ स्टम्पवर लागला फॉक्नरचा बॉल, अंपायरने रैनाला दिले नॉटआउट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड- ऑस्ट्रेलियाविरुद्द पहिल्या टी-20 सामन्यात सुरेश रैनाने 41 धावा केल्या. सामन्यात एक प्रसंग असाही आला की, रैना बॅटिंग करत असताना फॉक्नरचा एक बॉल सरळ स्टम्पवर येऊन आदळला. मात्र अंपायरनी रैनाला आऊट दिले नाही. तेव्हा रैना अवघ्या 14 धावांवर होता.

अशी आहे पूर्ण घटना...
- भारतच्या डावाचा 9वा ओव्हर जेम्स फॉक्नर ने फेकला. पहिल्या बॉलवर सुरेश रैनाने चौकार लगावला.
- दुसऱ्या बॉलवर फॉक्नरने बॉल टाकताच रैना स्टम्प सोडून बाजूला झाला. बॉल सरळ स्टम्पवर जाऊन लागला. आणि स्टंप उडाला.
- थोड्यावेळासाठी असे वाटले की, सुरेश रैना आउट झाला, मात्र कुण्याही ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने आउटचे अपील केले नाही.
- अंपायरने हा बॉल डेड म्हणून जाहिर केला. कारण बॉल फेकण्याच्या काही सेकंद आधिच रैना क्रीजपासून दूर झाला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे खास PHOTO'S...
फॉक्नरचा बॉल सरळ स्टम्पवर लागला.
फॉक्नरने बॉल फेकताच रैना क्रीजवरून बाजूला झाला.
बॉल स्टम्पवर लागला, मात्र रैनाने थांबण्याचा इशारा केला.
अंपायरने हा बॉल डेड म्हणून डिक्लेयर केला.
अंपायरच्या या निर्णयानंतर फॉक्नर च्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी दिसत होती.