आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Umpire Wears Helmet For Protection In Big Bash Match

हेल्मेट घालून पंच क्रिकेटच्या मैदानावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - क्रिकेटच्या मैदानावर हेल्मेट घालून खेळताना आपण अनेक खेळाडू पाहताे. मात्र, बिग बॅश लीगमधील (बीबीएल) एका सामन्यादरम्यान वेगळेच चित्र चाहत्यांना पाहायला मिळाले. या सामन्याच्या वेळी एक पंचच मैदानावर हेल्मेट घालून उतरल्याने उपस्थित चाहत्यांना माेठा धक्काच बसला. मेलबर्न रेनेगेड्स आणि पर्थ स्काॅचर्स यांच्यातील सामन्यादरम्यान पंच गेरार्ड अबुद यांनी हा पराक्रम केला. ते काळ्या रंगाचे हेल्मेट घालून मैदानावर उतरले. अशा प्रकारचा कारनामा करणारे गेरार्ड हे पहिले आॅस्ट्रेलियन पंच आहेत.

‘सुरक्षेच्या दृष्टीने मैदानावर हेल्मेट घालून जाण्याचा मी अनेक दिवसांपासून विचार करत हाेताे. अनेक वेळा गंभीर दुखापतीपासून मी स्वत:ला वाचवले. टी-२० मुळे क्रिकेट अधिक आक्रमक झाले आहे. त्यामुळे हा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरणार आहे,’ असेही गेरार्ड म्हणाले. तसेच भारतामध्ये रणजी चषक क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान आॅस्ट्रेलियन पंच जाॅन वार्ड यांच्या डाेक्याला दुखापत झाली हाेती.