आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पराभवानंतर साइड इफेक्ट; आफ्रिदीची कर्णधारपदावरून होऊ शकते हकालपट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - टीम इंडियाकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानच्या टी- 20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील (पीसीबी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफ्रिदीची कर्णधारपदावरून उचलबांगडी होण्याची शक्‍यता आहे.
- पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्‍ये आफ्रिदी आणि पाक संघाच्‍या कामगिरीमुळे निराशा आहे.
- पाक संघ सेमीफायनलमध्‍ये पोहोचला तर, पीसीबीच्‍या निर्णयावर ठाम असेल.
- पीसीबीचे अध्‍यक्ष शहरयार खान हे निवड समितीमध्‍ये बदल करतील, अशीही माहिती आहे.
सध्‍या अशी आहे पाकची स्‍थिती..
-
पाकिस्तानचे दोन मॅचमध्‍ये दोन पॉईंट आहेत.
-त्‍यांच्‍या गटात ते भारत, ऑस्ट्रेलियाच्‍या वर दुस-या क्रमांकावर आहेत.
-भारताकडून पराभव होण्‍यापूर्वी पाक पहिल्‍या सामन्‍यात बांग्लादेशसोबत जिंकले होते.
-पाकचा पुढचा सामना मोहालीमध्‍ये न्यूझीलंडसोबत होणार आहे.
आफ्रिदीच्‍या कामगिरीवर इम्रानचा प्रश्‍न
- माजी कर्णधार इम्रान खाननेही आफ्रिदीच्‍या कामगिरीवर प्रश्‍न उपस्‍थित केला आहे.
- इम्रानने आफ्रिदीचे नाव न घेता त्‍याला खडे बोल सुनावले आहेत.
- त्‍याने म्‍हटले की, “भारताचे तीन विकेट लवकरच गेले होते. तरीही दबाव आणला आला नाही.''
- ''दबाव निर्माण करणे ही कर्णधाराची भूमिका असायला हवी होती.''
- ''मार्गदर्शन घेण्‍यासाठी सिनियर खेळाडू असतानाही असे कसे काय होऊ शकते.''
- ''धोनीकडून धडा घेण्‍याची गरज आहे.”
पराभवानंतर काय म्‍हटले आफ्रिदीने..
- पराभवानंतर पाकचा कर्णधार आफ्रिदी म्‍हणाला की, ''विराट कोहलीने शानदार बॅटिंग केली.''
- ''विराटने हा सामना आमच्‍याकडून हिसकावून घेतला.''
- ''आमच्‍या युवकांनी भारतीय संघाकडून शिकायला पाहिजे की, दबाव असताना कसे खेळावे.''
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संंबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...