आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PCB चीफ म्‍हणाले- अफ्रिदीने मला सांगितले वर्ल्ड कपनंतर निवृत्‍त होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- वर्ल्‍ड कप झाल्‍यानंतर आपण निवृत्‍ती घेऊ, असे शाहिद अफ्रिदीनेच खुद मला सांगितले असल्‍याचा दावा पाकिस्तान कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान केला. दरम्‍यान, अफ्रिदीने तसे केले नाही तर त्‍याला संघात ठेवायचे की नाही, यावर विचार केला जाईल, असेही ते म्‍हणाले.
शाहिद अफ्रिदीने चूक कबुल केली
टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाकडून पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने अखेर मौन सोडले. मात्र, आफ्रिदीने स्वत:च्याच तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ईडन गार्डनची पिच समजू शकलो नसल्याचे त्याने सांगितले.

19 मार्चला झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला सहा विकेट राखून कोलकात्यात धूळ चालली. यानंतर आफ्रिदीवर प्रचंड टीका करण्‍यात आली होती. त्याच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्हही उपस्थित झाले होते. इतकेच नव्हे तर एका पाक मॉडेलच्या संतापाचाही सामना आफ्रिदीसह संपूर्ण पाक संघाला करावा लागला आहे. कंदील बलोज हिने आफ्रिदीला शिव्या घातल्या. तिने आफ्रिदीला क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.

आफ्रिदीला पडला स्वत:च्या तर्कावर प्रश्न...
- आफ्रिदी म्हणाला की, ''कोलकात्यातील ईडन गार्डनची पिच अाम्ही समजू शकलो नाही. '
- 4 वेगवान गोलंदाजांना संघात संधी दिली, हीच मोठी चूक झाल्याचे आफ्रिदीने कबूल सांग‍ितले.
- ईडनची पिच फिरकी गोलंदाजांसाठी पोषक होती. मात्र, आम्ही वेगवान गोलंदाजांसोबत भारताचा सामना करत होतो.
- पाक टीम लवकरच खेळा सुधारणा करून पुढील सामन्यात वापसी करेल, असा विश्वासही आफ्रिदीने व्यक्त केला.

मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत पीसीबी
- रिपोर्ट्सनुसार, आफ्रिदीबाबत पीसीबीने मोठा न‍िर्णय घेण्याची तयारी केली आहे.
- वर्ल्ड कप झाल्यानंतर कर्णधारपदावरून आफ्रिदीची हकालपट्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- आफ्रिदीसह टीमच्या परफॉर्मन्सवर पीसीबी नाराज आहे.
- पाक टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचली तरी पीसीबीच्या निर्णयात कोणताही बदल होणार नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. .
- इतकेच नव्हे तर निवड समिती फेरबदल करण्‍यात येणार असल्याचे संकेत पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी ‍दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...