आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवघ्या 2 धावांत अख्खा संघ गारद, एका चेंडूत विजय; 19 वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुंटूर- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीअाय) वतीने अायाेजित १९ वर्षांखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत केरळ संघाने विक्रमी कामगिरी नोंदवली. प्रतिस्पर्धी नागालँडला अवघ्या दाेन धावांत गारद केल्यानंतर केरळने अवघ्या एका चेंडूत विजय मिळवला. यापूर्वी, २००६ मध्ये नेपाळने म्यानमारविरुद्ध असा विजय संपादन केला हाेता.

 

१६ निर्धाव षटके; नऊ फलंदाज शून्यावर बाद   
प्रथम फलंदाजीत नागालँडची  दाणादाण उडाली. केरळच्या पाचही गाेलंदाजांनी १६ निर्धाव षटके टाकत ९ फलंदाज शून्यावर बाद केले. केरळची कर्णधार मनीने ४ षटकांत ४ तर, साैरभ्याने २ गडी बाद केले.

 

मेनका १८ चेंडू खेळली, काढली फक्त १ धाव 
नागालँडची फलंदाज मेनकाने एकाकी झुंज देताना १८ चेंंडूंचा सामना केला. तिने संघासाठी सर्वाधिक (!) केवळ एकच धाव काढली. उर्वरित ९ जणींना भाेपळाही फोडता आला नाही.

 

अंशूचा विजयी चाैकार

नागालँडच्या दीपिका कैनतुराने पहिलाच चेंडू वाइड टाकला. २ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केरळची सलामीवर अंशू एस. राजू हिने दीपिकाच्या दुसऱ्याच चेंडूवर चाैकार खेचला आणि केरळने अवघ्या एका चेंडूतच विजय मिळवला.

बातम्या आणखी आहेत...