आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Unmukt Chand To Lead In One dayers, Shikhar Dhawan Three day Match

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिखर धवन, उन्मुक्तकडे भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - दिल्लीच्या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंकडे बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्धच्या तीन दिवसीय अन् एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

शिखर धवन तीनिदवसीय सामन्यात तर उन्मुक्त चंद तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालीकेत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा वाहतील. बांगलादेशच्या भारत दौर्‍याला १६ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध गेल्या महिन्यात हात फ्रॅक्चर झाल्यामुळे धवन गाले येथील पहिल्या कसोटीनंतर खेळू शकला नव्हता. त्यामुळे सरावासोबतच संघाचे नेतृत्व करण्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले. वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोनलाही एकदिवसीय मालीकेसाठी संघात घेण्यात आले आहे.

कोहलीला फायदा!
विराट कोहली जर वनडे संघाचा कर्णधार झाला तर तो फायद्यात राहू शकतो. पुढच्या वर्षभरात भारताला बहुतेक सामने भारताच्या भूमीवरच खेळायचे आहेत. अशात कोहलीकडे जिंकण्याची संधी असेल. घरच्या मैदानावर टीम इंडिया बहुतेक वेळा विरोधी संघाला मात देतेच.

भारत अ चे दोन संघ असे
तीन दि‍वसीय सामन्याचा संघ : शिखर धवन (कर्णधार), अभिनव मुकुंद, करुण नायर, श्रेयस अय्यर, बाबा अपराजित, नमन ओझा, जयंत यादव, विजय शंकर, रवींद्र जडेजा, श्रेयस गोपाल, अभिमन्यू िमथुन, वरुण अ‍ॅरोन, ईश्वर पांडे आणि शेल्डन जॅक्सन.

एक दिवसीय संघ : उन्मुक्त चंद (कर्णधार), मयंक अग्रवाल, मनीष पांडे, सुरेश रैना, केदार जाधव, संजू सॅमसन, करुण नायर, कुलदीप यादव, जयंत यादव, कर्ण शर्मा, ऋषी धवन, एस.अरविंद, धवल कुलकर्णी, रश कलारिया आणि गुरकिरत सिंग.