आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: दिल्लीचा पंजाबवर 51 धावांनी विजय; बिलिंग्जचे अर्धशतक; माॅरिसचे 3 बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- जहीर खानच्या नेतृत्वात यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सने अायपीएलमध्ये दुसरा विजय संपादन केला. दिल्लीने अापल्या घरच्या मैदानावर शनिवारी ग्लेन मॅक्सवेलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा  ५१ धावांनी पराभव केला.क्रिस माॅरिस (३/२३), शाहबाद नदीम (२/१३), पॅट कमिन्स (२/२३) यांच्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर यजमान दिल्लीने सामना जिंकला. 

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सने ६ बाद १८८ धावा काढल्या. प्रत्युत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाबला ९ गड्यांच्या माेबदल्यात अवघ्या १३७ धावांपर्यंत मजल मारता अाली. पंजाबचा लीगमधील हा सलग दुसरा पराभव ठरला. पंजाबकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक २४ धावांची खेळी केली. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले.

नाणेफेक जिंकून दिल्ली डेअरडेव्हिल्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जहीर खानचा निर्णय सार्थकी लावताना सलामीच्या सॅमसन (१९) अाणि बिलिंग्जने (५५) दमदार सुरुवात केली. दरम्यान, श्रेयस अय्यरने २२, ऋषभ पंतने १५ अाणि माॅरिसने १६ धावांची खेळी केली. काेरी अँडरसनने नाबाद ३९ धावा काढल्या. त्याने २२ चेंडूंत प्रत्येकी तीन षटकार व चाैकार ठाेकून ही खेळी केली. मात्र, करुण नायर पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला भाेपळा न फाेडताच अाल्यापावली पॅव्हेलियन गाठावे लागले. पंजाबकडून संदीप शर्मा, माेहित शर्मा, अक्षर पटेल, करियप्पाने प्रत्येकी एक गडी बाद केला. वरुण अॅराेनने दाेन विकेट घेतल्या.  

सॅम बिलिंग्जचे शानदार अर्धशतक 
दिल्लीकडून सलामीवीर सॅम बिलिंग्जने झंझावाती खेळी करताना शानदार अर्धशतक ठाेकले. त्याने ४० चेंडूंचा सामना करताना ९ चाैकारांच्या अाधारे ५५ धावांची खेळी केली. याशिवाय त्याने सलामीच्या संजू सॅमसनसाेबत पहिल्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी रचली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...