माजी भारतीय क्रिकेटर सौरव गांगुलीने एका मुलाखतीत लग्नाची चुक झाल्याचे म्हटले होते. या मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, त्याच्या जीवनातील सर्वात चांगली चूक कोणती. त्यावर तो म्हणाला होता, ‘माझे लग्न’. क्रिकेटचे पॅशन असलेला गांगुली प्रेमाखातरही तेवढाच वचनबद्ध होता. व्हॅलेन्टाइन महिन्याच्या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगत आहोत, सौरव गांगुलीची लव्ह स्टोरी.
आधी फेल, नंतर दोन वेळा केले लग्न...
- सौरव आणि डोना शेजारी होते, मात्र या दोघांच्याही कुटुंबीयांचे मतभेत होते.
- हे दोघेही वेग-वेगळ्या शाळेत शिकत होते. शाळेत असतानाच सुरू झाली होती यांची लव्ह स्टोरी.
- 1996 मध्ये इंग्लंड टूरवर जाण्याआधीच गांगुलीने डोनाला प्रपोज केले होते.
- टुरवरून येताच या दोघांनीही एका मित्राच्या सहाय्याने कोर्ट मॅरेज करण्याचा विचार केला.
- हे तिघे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पोहोचताच ही बातमी माध्यमांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. परिणामी यांना लग्न न करताच परतावे लागले.
- यानंतर 12 ऑगस्ट, 1996 रोजी या दोघांनी परत कोर्टात जाऊन लग्न केले. लग्नाबद्दल घरच्यांना काहीही न सांगताच सौरव- श्रीलंका टूरवर गेले.
- काही दिवसानंतर लग्नाची बातमी समोर आली. यानंतर विरोध असतांनाही दोघांच्या घरच्यांना नमते घ्यावे लागले.
- 21 फेब्रुवारी, 1997 ला सौरव-डोना यांनी 7 फेरे घेऊन. पारंपारिक पद्धतीने लग्न केले.
- डोना ओडिसा डान्सर आहे. या शिवाय ती स्वतःचे डान्स स्कूलही चालवते. एवढेच नाही तर ती योगा आणि कराटेदेखील शिकवते.
- सौरव आणि डोनाची मुलगी सनाचा जन्म नोव्हेंबर, 2001 मध्ये झाला. तीदेखील पत्कृष्ट डान्सर आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सौरव गांगुलीची पत्नी डोना आणि मुलगी सनासोबतचे काही खास PHOTO'S...