आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Varn Warriors Won The Series Agent Sachin\'s Blasters

वाॅर्न वाॅरियर्स चॅम्पियन ! ३-० ने जिंकली मालिका; सचिन ब्लास्टर्स पराभूत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाॅल स्टार क्रिकेट मालिका जिंकल्यानंतर ट्राॅफीसह जल्लाेष करताना कर्णधार शेन वाॅर्नसह वाॅरियर्सचे खेळाडू. - Divya Marathi
अाॅल स्टार क्रिकेट मालिका जिंकल्यानंतर ट्राॅफीसह जल्लाेष करताना कर्णधार शेन वाॅर्नसह वाॅरियर्सचे खेळाडू.
लाॅस एंजलिस- क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या ‘सचिन ब्लास्टर्स’ टीमने अाॅल स्टार टी-२० क्रिकेटची मालिका गमावली. या टीमला पराभवाचा सामना करावा लागला. शेन वाॅर्नच्या टीमने विजयासह मालिका ३-० ने अापल्या नावे केली. वाॅर्न वाॅरियर्स संघाने तिसऱ्या सामन्यात सचिन ब्लास्टर्सचा धुव्वा उडवला. या टीमने ४ गड्यांनी सामना जिंकला. कॅलीस सामनावीर व संगकारा मालिकावीरचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना सचिन ब्लास्टर्स टीमने निर्धारित २० षटकांमध्ये ५ गडी गमावून २१९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात वाॅर्न वाॅरियर्सने १९.५ षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. रिकी पाँटिंगने नाबाद ४३ धावांची खेळी करून संघाला शानदार विजय मिळवून दिला. यामध्ये जॅक कॅलिसने ४७ अाणि कर्णधार शेन वाॅर्नने नाबाद ६ धावांचे याेगदान दिले. त्यामुळे वाॅरियर्सला शानदार विजय मिळवता अाला.

हेडन-सायमंडची अर्धशतकी भागीदारी
खडतर अाव्हानाचा पाठलाग करणाऱ्या वाॅर्न वाॅरियर्सची निराशाजनक सुरुवात झाली. सलामीचा मायकेल वाॅन भाेपळा न फाेडता अाल्यापावली तंबूत परतला. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर अालेल्या अँड्य्रू सायमंडने संघाचा डाव सावरला. त्याने सलामीवीर मॅथ्यू हेडनसाेबत दुसऱ्या गड्यासाठी ५० धावांची शानदार भागीदारी केली. त्याने १९ चेंडूंचा सामना करताना दाेन चाैकार अाणि तीन षटकारांच्या अाधारे ३१ धावांची खेळी केली. तसेच मॅथ्यू हेडनने ६ चेंडूंत १२ धावा काढल्या. यात प्रत्येकी एका षटकार व चाैकाराचा समावेश अाहे. तसेच संगकाराने ४२ धावांची खेळी केली.

वीरू-सचिनची अर्धशतकी भागीदारीची सलामी
वीरेंद्र सेहवाग अाणि सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा अापल्या तमाम चाहत्यांना जल्लाेषाची संधी मिळवून दिली. या जाेडीने सचिन ब्लास्टर्स टीमला शानदार अर्धशतकी भागीदारीची सलामी दिली. सेहवागने १५ चेंडूंत तीन चाैकार व दाेन षटकारांच्या अाधारे २७ धावा काढल्या.

पाँटिंगचा झंझावात
वाॅरियर्सकडून रिकी पाँटिंगने झंझावाती खेळी केली. त्याने २५ चेंडूंमध्ये नाबाद ४३ धावा काढल्या. यामध्ये तीन चाैकार व दाेन षटकारांचा समावेश अाहे. याशिवाय त्याने कॅलिसला चांगली साथ दिली. त्यामुळे कॅलिसला ४७ धावांची खेळी करता अाली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सचिन, गांगुलीची अर्धशतकी खेळी व्यर्थ आणी पाहा धाव फलक