आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण, जयंतने बांगलादेशच्या फलंदाजीचे मोडले कंबरडे, भारत ६७ धावांनी पिछाडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- द्रुतगती गोलंदाज वरुण अॅरोन अन् ऑफब्रेक गोलंदाज जयंत यादवने धारदार माऱ्यासह प्रत्येकी चार फलंदाजांना तंबूची वाट मोकळी करून देत आधी बांगलादेशच्या फलंदाजांना तंबूची वाट मोकळी करून दिली. नंतर भारत ‘अ’ संघाचा कर्णधार शिखर धवनने राऊडी स्टाइलने तडाखेबाज फलंदाजी करीत ११६ धावांचे नाबाद शतक झळकावले. यामुळे भारत ‘अ’-बांगलादेश तीन दिवसीय कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने लढतीत मजबूत स्थिती मिळवली.
बांगलादेशला भारताने पहिल्या डावात ५२.४ षटकांत सर्वबाद २२८ धावांवर रोखले. त्यानंतर यजमान संघाने पहिला दिवसअखेर ३३ षटकांत एक बाद १६१ धावा उभारल्या. भारत अजूनही ६७ धावांनी माघारला असून, ९ फलंदाज शिल्लक आहेत.

एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला. वरुण अॅरोन आणि जयंत यादव या दोन्ही गोलंदाजांनी तो स्तुत्य ठरवत असा काही भेदक मारा केला की, बांगलादेशच्या फलंदाजांना पळता भुई थोडी झाली. केवळ सहा धावांवर बांगलादेशचे चार फलंदाज तंबूत परतले होते. यावरून भारतीय गोलंदाजांपुढे बांगलादेशची कशी त्रेधा उडाली ते ध्यानात येईल.

सब्बिर रहमानने भारतीय गोलंदाजीचा चिवटपणे सामना करून १२२ धावा तडकावल्यामुळे बांगलादेशला २०० धावांच्यावर मजल मारता आली. पाहुण्यांकडून अष्टपैलू शुवागाता होमने ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली, तर नासीर होसेनने ३२ धावांचे योगदान दिले. उर्वरित आठही फलंदाजांनी मात्र शरणागती पत्करली. पाहुण्या संघातील सहा फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतले.

भारताने पहिल्या डावात दमदार सुरुवात केली. कर्णधार शिखर धवन आणि अभिनव मुकुंद यांनी १५३ धावांची सलामी दिली. मुकुंद ३४ धावांवर तंबूत परतला. मात्र, धवन ११६ धावांवर आणि श्रेयस अय्यर ६ धावांवर खेळत आहेत. उद्या सामन्याचा दुसरा दिवस आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा राऊडी फलंदाज डावखुऱ्या शिखर धवनने घरच्या खेळपट्टीवर बांगलादेशच्या गोलंदाजीची लक्तरे वेशीवर टांगताना ११२ चेंडंूत १६ चौकार, दोन षटकारांसह नाबाद ११६ धावा तडकावल्या.

धारदार गोलंदाजी
वरुण अॅरोनने ११ षटके गोलंदाजी करून एक निर्धाव टाकत ४५ धावांत घेतले
४ बळी.
जयंत यादवने ७.४ षटकांच्या गोलंदाजीत तीन निर्धाव टाकून २८ धावांत ४ फलंदाज टिपले.
बांगलादेशचे सहा फलंदाज भोपळाही न फोडता परतले तंबूत, आठ फलंदाजांना दुहेरी अंकापर्यंत पोहोचण्यात अपयश
धावफलक
बांगलादेश पहिला डाव : अनामुल हक झे. ओझा गो. पांडे ०, सौम्य सरकार झे. ओझा गो. अॅरोन ०, मोमीनूल हक झे. ओझा गो. अॅरोन २, लिटून दास झे. बदली खेळाडू (बी.अपराजित) गो. अॅरोन ०, सब्बिर रहमान नाबाद १२२, नासीर होसेन झे. ओझा गो. मिथुन ३२, शुवागाता हाेम झे. नायर गो. अॅरोन ६२, सकलेन साजिब पायचित गो. यादव ४, शफिउल इस्लाम त्रि.गो. यादव ०, रुबेल होसेन त्रि.गो. यादव ०, जुबैर होसेन पायचित यादव ०, अवांतर ६, एकूण ५२.४ षटकांत सर्वबाद २२८.

गोलंदाजी : ईश्वर पांडे ११-२-४८-१, वरुण अॅरोन ११-१-४५-४, अभिमन्यू मिथुन ११-२-५१-१, रवींद्र जडेजा ९-०-३५-०, जयंत यादव ७.४-३-२८-४, विजय शंकर ३-१-१६-०.

गोलंदाजी : शफिउल इस्लाम ३-१-१०-०, रुबेल होसेन २.५-१-१६-०, सौम्या सरकार ०.१-०-०-०, शुवागाता होम ९ -२-३७-१, सकलेन साजिब ८-०-४५-०, जुबेर होसेन ४-०-३५-०.

भारत पहिला डाव (पहिला दिवसअखेर) : अभिनव मुकुंद त्रि.गो. शुवागाता होम ३४, शिखर धवन खेळत आहे ११६, श्रेयस अय्यर खेळत आहे ६, अवांतर ५, एकूण ३३ षटकांत १ बाद १६१.