आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर. अश्विन सक्षम गोलंदाज; व्यंकटपथी राजूची मुक्तकंठाने स्तुती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत नंबर वन गोलंदाज झाल्याबद्दल माजी फिरकीपटू व्यंकटपथी राजूने आर. अश्विनची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. विकेट घेण्याची अश्विनी क्षमता जबरदस्त आहे. मॅच विनर होण्यासाठी आता त्याला आणखी काही वेगळे करण्याची गरज नाही, असेही त्यांनी म्हटले.

अश्विनच्या गोलंदाजीत जबरदस्त विविधता आहे. त्याने स्वत:ला क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपांत स्थापित केले आहे. तिन्ही स्वरूपांत स्वत:ला सेट करणे, हे वाटते इतके सोपे काम मुळीच नाही. माझ्या अंदाजाने त्याने काही दिवसांपूर्वी वेगळे काही करण्याचा प्रयोग केला होता. तो यशस्वी झाला व मूळ गोलंदाजीवर पुन्हा आला. अश्विनला वेगळे काही करण्याची गरज नाही. त्याची आताची गोलंदाजी मजबूत आणि चांगली आहे. आपल्याकडे फिरकीत अनिल कुंबळे आणि हरभजनसिंग सारखे प्रमुख गोलंदाज होते. आता अश्विन फिरकीचा प्रमुख गोलंदाज आहे, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...