आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी चषक : विदर्भाची महाराष्ट्रावर ८२ धावांनी मात; वखरे चमकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रावर विदर्भाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे आदित्य सरवते आणि अक्षय वखरे. - Divya Marathi
महाराष्ट्रावर विदर्भाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे आदित्य सरवते आणि अक्षय वखरे.
नागपूर - यजमान विदर्भाने अापल्या घरच्या मैदानावर रणजी चषकात महाराष्ट्र टीमवर ८२ धावांनी मात केली. अक्षय वखरे (६/५८) अाणि अादित्य सरवतेे (४/७४) यांच्या फिरकीत अडकलेल्या महाराष्ट्राचा धुव्वा उडवला. त्यामुळे यजमान टीमला शानदार विजय संपादन करता अाला. या वेळी १४९ धावांत दुसरा डाव गुंडाळणाऱ्या विदर्भाने साेमवारी चमत्कारिक खेळी करताना २४५ धावांचा पाठलाग करणाऱ्या महाराष्ट्राला १६२ धावांमध्ये राेखले. विजयासह विदर्भ संघाने सहा गुणांची कमाई केली. त्यामुळे विदर्भाला अ गटाच्या गुणतालिकेत १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर धडक मारता अाली.
अक्षय, अादित्य चमकले
यजमान विदर्भ टीमचे अक्षय वखरे अाणि अादित्य सरवटे हे दाेन्ही गाेलंदाज घरच्या मैदानावर चमकले. अक्षय वखरेने २२ षटकांमध्ये ५८ धावा देत सहा गडी बाद केले. त्याने अाैरंगाबादच्या अंकित बावणेसह केदार जाधव, श्रीकांत मुंढे, चिराग खुराणा अाणि संकलेचा यांना शेवटच्या दिवशी बाद केले. तसेच अादित्यने १८.३ षटकांमध्ये ७४ धावा देऊन चार बळी घेतले.

हर्षद खडीवालेची एकाकी झुंज
महाराष्ट्र संघाने साेमवारी चाैथ्या दिवशी १ बाद ३ धावांवरून खेळण्यास सुरुवात केली. या वेळी अंकित बावणे अाणि खडीवाले यांनी ६१ धावांची भागीदारी करताना संघाच्या धावसंख्येला गती दिली. अंकित बावणेने २३ धावा काढल्या. केदार जाधवन २८ धावा काढू शकला. श्रीकांत मुंढे (४), चिराग खुराणा (९) अाणि राहुल त्रिपाठी (८) झटपद बाद झाले. खडीवालेने ६१ चेंडूंमध्ये ९ चाैकारांसह एक षटकार ठाेकून ५५ धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक
विदर्भ : पहिला डाव : ३३२, दुसरा डाव : १४९, महाराष्ट्र : पहिला डाव : २३७, दुसरा डाव : १६२ (खडीवाले ५५, अंकित २३, केदार २८, ६/५८ अक्षय, ४/७४ अादित्य)